डायबिटीसवर नियत्रंण
डॉ. के. सोमनाथ गुप्ता हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये डायबेटोलॉजीस्ट आहेत. त्यांनी या शतपावलीचे फायदे सांगितले आहेत. त्यांच्या मते रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. याशिवाय रात्रीच्या जेवणानंतर चालल्यामुळे इन्सुलिनची वाढ होते, ज्यामुळे रक्तातल्या साखरेचे प्रमाण कमी होऊन डायबिटीस नियंत्रणात येतो. त्यामुळे शतपावली ही मधुमेहाच्या रूग्णांसाठी प्रचंड फायद्याची आहे.
advertisement
चांगली झोप येते
शतपावलीमुळे अन्न पचल्याला मदत झाल्यामुळे आतड्याचं कार्यही सुरळीत पार पडतं. त्यामुळे रात्री शरीरावर तणाव कमी पडून चांगली झोप लागते. चालल्यामुळे अधिकच्या कॅलरीस बर्न होतात, त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.
सुसंवाद वाढतो
तुम्ही नियमितपणे शतपावली घालत असाल, तर तुम्हाला पाहून तुमच्या परिवारातले सदस्य किंवा तुमचे मित्र तुमच्यासोबत शतपावली घालायला येतील. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला फायदा मिळेल आणि तुमच्याचला सुसंवादही वाढेल. याशिवाय शतपावलीमुळे आरोग्यात लक्षणीय बदल दिसू शकतात.
हे सुद्धा वाचा :Health Updates: हिवाळ्यातील मॉर्निंग वॉक बेतू शकतो जीवावर, वाढतोय 'या' गंभीर आजाराचा धोका
‘ही’ घ्या काळजी
चालण्याचे अनेक फायदे असले तरीही मॉर्निंग वॉक किंवा शतपावली सुरू करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. अस्वस्थता किंवा अपचन टाळण्यासाठी भरपेट खाल्ल्यानंतर 15-30 मिनिटे वाट पाहा मगच चालयला सुरूवात करा. चालण्याची गती ही मध्यम ठेवा जोरात चालल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं किंवा तुमच्या पायात गोळे येऊ शकतात. याशिवाय जर तुम्हाला कोणते आजार असतील तर आधी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करूनच शतपावली किंवा मॉर्निंग वॉकला सुरूवात करण्याचा सल्ला डॉ. गुप्ता देतात. जर रात्रीच्या जेवणानंतर चालणे योग्य वाटत नसेल, तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही चालू शकता. तेही जमत नसेल स्ट्रेचिंग किंवा योगासारख्या हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.