हसणं जीवावर का बेतू शकतं?
संशोधनातून असं दिसून आलं आहे की, जास्त वेळ मोठ्याने हसल्यास कार्डियाक ॲरिथमिया (अनियमित हृदयाचे ठोके), सिंकोप (अचानक बेशुद्धी) आणि अन्ननलिका फाटणे (Esophageal Rupture) यांसारख्या गंभीर गुंतागुंत (Complications) होऊ शकतात. हा धोका जीवघेणा (Fatal) ठरू शकतो, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
जेव्हा आपण हसतो, तेव्हा शरीर एकाच वेळी अनेक प्रक्रिया करतं. डायाफ्राम आणि श्वसनाचे स्नायू वेगाने हलतात, ज्यामुळे हृदय गती (Heart Rate) आणि ऑक्सिजनचे सेवन (Oxygen Intake) वाढते.
advertisement
यामुळे काय त्रास होतो?
- अचानक बेशुद्धी (Laughter-Induced Syncope): खूप मोठ्याने हसल्याने रक्तदाबात (Blood Pressure) अचानक घट होते आणि व्यक्ती बेशुद्ध पडू शकते.
- हृदयाच्या समस्या: ज्यांना आधीपासून हृदयाचे विकार (Heart Problems) आहेत, त्यांना जास्त हसल्यामुळे अनियमित हृदयाचे ठोके जाणवू शकतात.
- अन्ननलिका फाटणे: काही दुर्मिळ घटनांमध्ये, खूप जोरदार हसल्याने अन्ननलिका (Food Pipe) फाटण्याचा (Rupture) धोका निर्माण होतो, ज्यासाठी त्वरित वैद्यकीय मदतीची गरज भासते.
कोणासाठी धोका जास्त? हसणं सर्वांसाठी फायदेशीर असलं तरी, ज्यांना हृदयाचे आजार, न्यूरोलॉजिकल विकार किंवा जठरासंबंधी (Gastrointestinal) कमजोरी आहे, त्यांच्यासाठी जास्त हसणं ही एक गंभीर समस्या बनू शकते. त्यामुळे आनंद नक्की घ्या, पण आरोग्याच्या स्थितीबद्दल जागरूक राहून हसा!
हे ही वाचा : जिम-ट्रेडमिलची गरज नाही! 'या' ५ साध्या सवयी स्वतःला लावू घ्या; तुमचे हृदय राहील निरोगी आणि मजबूत
हे ही वाचा : नात्यात गोडवा टिकवून ठेवायचा आहे? पार्टनरला 'हे' ५ खोटे बोलण्यास हरकत नाही, नातं होईल आणखी मजबूत
