अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ यूटाच्या संशोधकांनी केलेल्या एका धक्कादायक अभ्यासात असे आढळले आहे की, ज्यांच्या शुक्राणूंची संख्या अत्यंत कमी असते, अशा पुरुषांच्या मुलांमध्ये कॅन्सरचा धोका तब्बल 150 पट अधिक असतो. इतकंच नाही, तर अशा पुरुषांच्या कुटुंबातील इतर सदस्यांमध्येही कर्करोग होण्याची शक्यता अधिक प्रमाणात दिसून आली आहे.
संशोधनात समोर आलेली धक्कादायक माहिती
advertisement
संशोधकांनी 1996 ते 2017 या कालावधीत 786 पुरुषांवर सखोल अभ्यास केला. त्यापैकी 426 पुरुषांमध्ये स्पर्म पूर्णतः अनुपस्थित (Azoospermia) होते, तर 360 पुरुषांमध्ये ते अत्यंत कमी प्रमाणात (Oligospermia) आढळले. तुलना करता, ज्यांच्या शुक्राणूंची संख्या सामान्य होती आणि ज्यांना मुले होती, अशा पुरुषांच्या कुटुंबात कर्करोगाचा धोका खूपच कमी होता.
अभ्यासानुसार, लो स्पर्म काउंट असलेल्या पुरुषांच्या कुटुंबांमध्ये कॅन्सरचा धोका 150% अधिक असल्याचं निष्कर्षात नमूद करण्यात आलं आहे.
कोणत्या कॅन्सरचा धोका जास्त?
या संशोधनात असे समोर आले की, लो स्पर्म काउंट असलेल्या पुरुषांच्या कुटुंबात, हाडे आणि सांधे कॅन्सरचा धोका 156%, लिम्फोमाचा 60%, सॉफ्ट टिश्यू कॅन्सरचा 56%,
थायरॉइड कॅन्सरचा 54% आणि गर्भाशय (Uterine) कॅन्सरचा 27% पर्यंत वाढलेला धोका आढळला.
तर स्वतः त्या पुरुषांमध्ये टेस्टिक्युलर कॅन्सरचा धोका 134%, बोन-जॉइंट कॅन्सरचा 143% आणि कोलन कॅन्सरचा 16% अधिक असल्याचं समोर आलं. एक वेगळीच बाब म्हणजे, ग्रासनलिकेच्या (Esophagus) कॅन्सरचा धोका उलट 61% कमी असल्याचं आढळलं.
धोका का वाढतोय?
वैज्ञानिकांच्या मते, एका कुटुंबात एकसारख्या सवयी, जीवनशैली किंवा आनुवंशिक कारणांमुळे अशा प्रकारचे आजार पिढ्यान्पिढ्या पुढे जातात. संशोधक जोमी रॅम्सी यांनी सांगितले की, “कॅन्सर आणि वंध्यत्व (Infertility) यामागे जीन म्युटेशन म्हणजेच जनुकांतील बदल हे प्रमुख कारण असू शकतं.” सध्या या संशोधकांची टीम त्या कुटुंबांच्या डीएनएची तपासणी करत आहे, ज्यामुळे कोणते जनुक या संबंधाला जबाबदार आहेत, हे स्पष्ट होऊ शकते.
लो स्पर्म काउंटची कारणं
लो स्पर्म काउंट ही समस्या साधारणपणे अति मद्यपान, धूम्रपान, ड्रग्ज सेवन, उष्णता, रेडिएशनचा संपर्क आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या कारणांशी निगडीत आढळते.
पिढ्यान्पिढ्या वाढतोय धोका
अभ्यासातून आणखी एक गंभीर बाब उघड झाली ज्यांच्या कुटुंबात पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होता, त्या घरात पुढच्या पिढ्यांमध्येही कर्करोगाचा धोका वाढलेला दिसून आला. काही प्रकरणांमध्ये मुलांमध्ये बालपणीच कॅन्सरची लक्षणं दिसली. यावरून हे स्पष्ट होतं की, लो स्पर्म काउंट ही केवळ पुरुषांची वैयक्तिक समस्या नसून ती संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. संशोधकांच्या मते, या निष्कर्षांच्या आधारे डॉक्टर भविष्यात अशा कुटुंबांची आधीच ओळख करून, त्यांना कर्करोगविषयी आवश्यक जांच व सावधगिरी सुचवू शकतील.
