अशी करा लकी बांबूची योग्य देखभाल
पाणी देण्याची योग्य पद्धत : लकी बांबू निरोगी ठेवताना सर्वात मोठी चूक म्हणजे जास्त पाणी देणे, ज्यामुळे रोपांची मुळे कुजू शकतात. जर तुम्ही तो पाण्याच्या वासमध्ये वाढवत असाल, तर मुळे पूर्णपणे पाण्यात बुडलेली ठेवा आणि दर 7–10 दिवसांनी पाणी बदला. मातीमध्ये लावलेला असल्यास पाणी देण्यापूर्वी वरची माती सुकली आहे की नाही ते पाहा. योग्य ओलावा मिळाल्यास रोप हिरवागार आणि सुंदर दिसते.
advertisement
तापमानाची घ्या काळजी : हे रोप भारतातील उष्ण हवामानासाठी अगदी योग्य आहे. ते 18°C ते 30°C या तापमानात ठेवा. हीटर किंवा एअर कंडिशनरजवळ ठेवू नका. कारण अचानक तापमान बदलल्यास रोप खराब होऊ शकते. आर्द्रतेच्या बाबतीत हे सरासरी पातळीचा ओलावा सहज सहन करू शकते.
खत असे द्या : लकी बांबूला फारसे खत लागत नाही. महिन्यातून फक्त 1–2 थेंब हलके लिक्विड फर्टिलायझर पुरेसे असते. जर पाण्यातील वासमध्ये मुळे लाल दिसत असतील तर घाबरू नका, ते निरोगी रोपाचे लक्षण आहे. पिवळे पडलेले किंवा तणावग्रस्त रोप असेल तर त्याला खत देऊ नका. सौम्य पर्याय म्हणून फिश इमल्शन किंवा कंपोस्ट टीचा वापर करता येतो.
प्रकाश महत्त्वाचा : या रोपाच्या वाढीत प्रकाशाची महत्त्वाची भूमिका असते. तेजस्वी पण अप्रत्यक्ष प्रकाशात हे रोप सर्वात चांगले वाढते. नैसर्गिक प्रकाश असलेल्या खोलीत जिथे हलके (sheer) पडदे असतील तिथे ठेवा. थेट सूर्यप्रकाशामुळे पाने जळू शकतात. खूप कमी किंवा खूप जास्त प्रकाशामुळे पानांचा रंग पिवळा किंवा तपकिरी होऊ शकतो.
अशी करा छाटणी : लकी बांबू निरोगी ठेवण्यासाठी वेळोवेळी छाटणी करणे आवश्यक आहे. पिवळी किंवा खराब झालेली पाने कापा. मुख्य देठ कापू नका; फक्त बाजूचे देठ आणि लहान शूट्स कापा आणि मुख्य देठापासून सुमारे 1–2 इंच अंतरावर ट्रिम करा. यामुळे रोपाला नवीन आणि निरोगी पाने येतात आणि आकारही सुंदर राहतो.
योग्य देखभालीसह लकी बांबू केवळ तुमचे घर आणि ऑफिस हिरवेगार ठेवत नाही तर सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणतो. नियमित पाणी, प्रकाश, तापमान आणि छाटणी यांची काळजी घ्या. अशाप्रकारे त्याला दीर्घकाळ निरोगी आणि आकर्षक ठेवा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
