TRENDING:

पुढारी कसा कडकच पाहिजे! विधानसभा निवडणुकीमुळे खादीला भाव, ट्रेंड पाहिले का?

Last Updated:

Khadi: विधानसभा निवडणुकीमुळे खादीच्या कपड्यांना मागणी वाढली आहे. तसेच खादीच्या दरातही वाढ झालीये. यंदा खादीच्या कोणत्या कपड्यांची क्रेझ आहे? जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं असून सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे अगदी गल्लीबोळातील पुढारीही कडक दिसत आहेत. या काळात खादीच्या कपड्यांना सर्वाधिक पसंती दिसते. त्यामुळे सध्या खादी कपड्यांना चांगलाच भाव आलाय. खादीत सुद्धा विविध प्रकार आहेत. पण यंदा कोणत्या कपड्याचा ट्रेंड आहे? किंवा नेतेमंडळीत काय क्रेझ आहे? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील व्यापारी मधुर अग्रवाल यांनी माहिती दिलीये.

advertisement

पुढारी म्हणजे खादीचे कपडे

आपल्याकडे कोणत्याही राजकीय नेत्याची खादीच्या कपड्यांना सर्वाधिक पसंती असते. त्यामुळे बहुतांश नेते हे खादी परिधान केलेले दिसतात. खादी कर्ता आणि पायजमा हा आजच्या काळातही राजकीय नेत्यांचा गणवेश म्हणावा इतका सर्वमान्य असतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खादीच्या कपड्याला मागणी वाढली आहे. अगदी 150 रुपयांपासून ते 5 हजार रुपये मीटरपर्यंत खादीचे कपडे छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध आहेत.

advertisement

अडीच रुपयांची टोपी अन् 10 रुपयांचा झेंडा! विधानसभा निवडणुकीत कुणाला भाव?

तयार कपड्यांना मागणी

सध्या खादीच्या तयार म्हणजेच रेडिमेड कपड्यांना मोठी मागणी आहे. त्यातही पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना विशेष पसंती आहे. 700 रूपये मीटर पासून ते 3 हजार रुपये मीटर पर्यंतच्या कपड्यांची अधिक खरेदी केली जाते. कडक खादी, जुट, लेनिन, कोसा, बागलपुरी, कॉटन, गिजा कॉटन असे विविध प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये शर्ट, कुर्ता, शॉर्ट कुर्ता, जॅकेट उपलब्ध आहेत.

advertisement

किती आहेत किमती?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1 की 2 नोव्हेंबर, कोणती एकादशी धरायची? तुळशी विवाहाचे दिवस, मुहूर्त आणि महत्त्व
सर्व पहा

सध्या खादीचे शर्ट 500 रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच शॉर्ट कुर्ता आणि कुर्ता 500 रुपयांपासून मिळतोय. तर जॅकेट तेराशे रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत आहेत. मागणी वाढल्याने खादीच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. आता 20 ते 25 टक्क्यांनी खादीचे कपडे महाग मिळत असल्याचे व्यापारी मधुर अग्रवाल सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पुढारी कसा कडकच पाहिजे! विधानसभा निवडणुकीमुळे खादीला भाव, ट्रेंड पाहिले का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल