TRENDING:

हळूहळू विसरत होता तरुण, झाला मृत्यू, रहस्य उलगडताच सगळे हादरले

Last Updated:

Man died after lost memory : डॉक्टरांनी या तरुणाला तो फक्त नैराश्याने ग्रस्त आहे ज्यामुळे त्याला असं वाटत असल्याचं सांगितलं. पण त्याला सतत वाटत होतं की ते काहीतरी वेगळे आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आपण कधी ना कधी, काही ना काही गोष्टी विसरतो. कधी कधी तर एखाद्याचं नाव पटकन आठवत नाही, एखादी वस्तू आपण कुठे ठेवली ते आठवत नाही, कुठेतरी आपल्याला जायचं होतं ते लक्षात राहत नाही. पण अशा विसराळूपणामुळे कुणाचा मृत्यू झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? एक असा तरुण अशाच काही गोष्टी विसरू लागला. हळू हळू त्याचा हा विसराळूपणा वाढला आणि त्याचा मृत्यू झाला. यूकेतील ही धक्कादायक घटना आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

डर्बीशायरमधील एकिंग्टन येथील रहिवासी जेमी अकास्टर हा फुटबॉलचा चाहता होता. अचानक त्याला त्याच्या आवडत्या संघातील खेळाडूंची नावं आठवण्यास त्रास होऊ लागला. इतकंच नाही तर तो अनेक संभाषणंदेखील विसरू लागला. परंतु डॉक्टरांशी अनेक वेळा बोलल्यानंतर त्यांनी जेमीला सांगितलं की तो फक्त नैराश्याने ग्रस्त आहे ज्यामुळे त्याला असं वाटत आहे.

नैराश्य नाही वेगळंच कारण

advertisement

पण जेमीला सतत वाटत होतं की ते काहीतरी वेगळे आहे. कारण त्याला तो नैराश्येने ग्रस्त असल्यासारखं वाटत नव्हतं. हळूहळू त्याची स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागली. त्याची बहीण डोना सायल, जी एक नर्स आहे, तिने त्याला ए अँड ई रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. येथे त्याला चेस्टरफील्ड रॉयल हॉस्पिटलमध्ये एमआरआय स्कॅन करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्याला कळलं की त्याला हाय ग्रेड ग्लिओब्लास्टोमा आहे.

advertisement

Heart Attack : कुणाला हार्ट अटॅक आला तर सगळ्यात आधी काय करायचं?

ग्लिओब्लास्टोमा हा सर्वात प्राणघातक ब्रेन ट्यूमरपैकी एक आहे. दरवर्षी सुमारे 3 हजार ब्रिटन आणि सुमारे 12000 अमेरिकन लोक याने ग्रस्त आहेत. या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी घ्यावी लागते.

शस्त्रक्रिया केली तरी मृत्यू

जेमीवरही शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्या शस्त्रक्रियेद्वारे त्याचा 95 टक्के ट्यूमर काढून टाकण्यात आला. यानंतर जेमीवर अनेक महिने उपचार केले गेले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 1 सप्टेंबर 2024 रोजी त्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे त्याच्या कुटुंबाला खूप धक्का बसला. हे सगळं इतक्या लवकर कसं घडलं हे त्यांना समजत नाहीये.

advertisement

नवरा मूल देऊ शकत नव्हता, 15 IVF सुद्धा फेल, शेवटी AI ने महिलेला केलं प्रेग्नंट, कसं काय?

जेमीचे कुटुंब आता लोकांना या आजाराची लक्षणं समजून घेण्याचा आणि सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला देत आहे. त्याची बहीण सायले म्हणाली, या आजारापासून वाचण्यासाठी लोकांना त्याची सुरुवातीची लक्षणं समजून घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून खूप वाईट स्थिती टाळता येईल. जर उशीर झाला तर सर्वकाही नियंत्रणाबाहेर जातं. डोकेदुखी, झटके, मळमळ, उलट्या आणि निद्रानाश इत्यादी लक्षणांमध्ये त्याची लक्षणं समाविष्ट आहेत. याशिवाय स्मरणशक्ती कमी होणं, बोलण्यात अडचण येणं, दृष्टी बदलणं आणि व्यक्तिमत्त्वात बदल होणं हीदेखील ट्यूमरची लक्षणं आहेत.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हळूहळू विसरत होता तरुण, झाला मृत्यू, रहस्य उलगडताच सगळे हादरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल