TRENDING:

Skin Care : त्वचेची काळजी घेताना या चुका टाळा, स्किन एक्स्पर्टचा हा सल्ला महत्त्वाचा

Last Updated:

त्वचेसाठी विविध उत्पादनं आणि घरगुती उपाय वापरले जातात. पण कधीकधी, त्वचेची काळजी घेण्याच्या प्रयत्नात, होणाऱ्या अनेक चुकांमुळे चांगलं होण्यापेक्षा जास्त नुकसान करतात. यापेक्षा, त्वचेची नियमित निगा राखणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्वचेचा प्रकार समजून घ्या आणि त्यानुसार उत्पादनं वापरणं आवश्यक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सुंदर, चमकदार त्वचेसाठी विविध उत्पादनं आणि घरगुती उपाय वापरले जातात. पण कधीकधी, त्वचेची काळजी घेण्याच्या प्रयत्नात, होणाऱ्या अनेक चुकांमुळे चांगलं होण्यापेक्षा जास्त नुकसान करतात.
News18
News18
advertisement

प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ जयश्री शरद यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत यातल्या तीन चुकांविषयी माहिती दिली आहे.

चेहऱ्यावर दररोज बर्फ लावणं - चेहऱ्यावर दररोज बर्फ चोळल्यानं किंवा बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवल्यानं त्वचा चमकदार दिसेल असं अनेकांना वाटतं. बर्फ लावल्यानं सूज तात्पुरती कमी होते आणि रक्ताभिसरण वाढतं, ज्यामुळे चेहरा उजळ दिसतो, पण रोज असं केल्यानं त्वचा डिहायड्रेट होऊ शकते आणि कोरडेपणा वाढू शकतो.

advertisement

म्हणून, बर्फाचा वापर दररोज नाही तर अधूनमधूनच करा.

Ear Phones : इअर फोन्सचे धोके ओळखा, श्रवणशक्तीवर होतो गंभीर परिणाम

जास्त एक्सफोलिएटिंग - स्वच्छ आणि ताज्या त्वचेसाठी एक्सफोलिएशन आवश्यक आहे, पण जास्त वापरामुळे त्वचा खराब होऊ शकते. त्वचेवरचे थर खराब झाल्यानं ती संवेदनशील होते आणि मुरुमं होण्याची शक्यता वाढते. म्हणून, आठवड्यातून फक्त 1-2 वेळा सौम्य एक्सफोलिएशन करा. त्वचा आधीच संवेदनशील असेल तर आणखी काळजी घ्या.

advertisement

एकाच वेळी अनेक घटकांचा वापर - त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत, ज्यात वेगवेगळे हायलुरोनिक एसिड, रेटिनॉल, व्हिटॅमिन सी असे सक्रिय घटक असतात. चेहऱ्यावर सर्वकाही पर्याय एकावेळी लावावेत असा त्याचा अर्थ नाही. त्वचा तज्ज्ञांच्या मते, त्वचेला सर्व गोष्टींची गरज नसते, फक्त तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी आणि समस्येसाठी जे योग्य आहे तेच वापरावं. एकाचवेळी सर्व उत्पादनं एकत्र केल्यानं त्वचेला त्रास होऊ शकतो.

advertisement

Hair Care : केसांच्या काळजीसाठी कोरियन हेअर पॅक, केसांचं सौंदर्य राहिल शाबूत, वाचा हेअर पॅक बनवण्याची कृती

त्वचेसाठी एक चांगलं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन पुरेसं असतं. योग्य स्किनकेअर उत्पादन निवडणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच चुका टाळणं देखील महत्त्वाचं आहे. दररोज बर्फाचा वापर, जास्त एक्सफोलिएशन आणि प्रत्येक उत्पादन चेहऱ्यावर लावल्यानं त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं.

advertisement

यापेक्षा, त्वचेची नियमित निगा राखणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्वचेचा प्रकार समजून घ्या आणि त्यानुसार उत्पादनं वापरा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : त्वचेची काळजी घेताना या चुका टाळा, स्किन एक्स्पर्टचा हा सल्ला महत्त्वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल