Hair Care : केसांच्या काळजीसाठी कोरियन हेअर पॅक, केसांचं सौंदर्य राहिल शाबूत, वाचा हेअर पॅक बनवण्याची कृती

Last Updated:

कोरियन सौंदर्य पद्धती जगभरात लोकप्रिय होते आहे आणि त्यांच्या केसांची काळजी घेण्याच्या पद्धती अनेकांना आवडतायत. कोरियन महिलांच्या जाड, चमकदार आणि लांब केसांचं रहस्य यात दडलंय. जाणून घेऊया कोरियन हेअर पॅकबद्दल.

News18
News18
मुंबई : सध्या कोरियन फेस मास्क, हेअर मास्कचा बोलबाला आहे. कोरियन सौंदर्य पद्धती जगभरात लोकप्रिय होते आहे आणि त्यांच्या केसांची काळजी घेण्याच्या पद्धती अनेकांना आवडतायत. कोरियन महिलांचे जाड, चमकदार आणि लांब केसांचं रहस्य यात दडलंय.
जाणून घेऊया कोरियन हेअर पॅकबद्दल. केस जाड, लांब आणि मजबूत बनवण्यासाठी हेअर पॅक उपयुक्त ठरतील.
advertisement
कोरियन हेअर केअरची जादू - केसांची निगा राखताना प्रामुख्यानं नैसर्गिक घटकांवर आणि टाळूच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिलं जातं. निरोगी केसांचा पाया निरोगी टाळूपासून सुरू होतो. कोरियन हेअर पॅकमधले घटक केस मजबूत करण्यासाठी टाळूवर काम करतात. कोरियन हेअर केअर पद्धती मुख्यत्वे टाळू, मुळांवर केंद्रित आहे.
advertisement
यात सहसा ग्रीन टी, कोरफड आणि अंडी यासारखे घटक असतात.
कोरियन हेअर पॅक घरी बनवण्यासाठी कृती -
एक अंड, दोन टेबलस्पून एलोवेरा जेल, एक टेबलस्पून नारळ तेल, एक टीस्पून जिनसेंग पावडर (पर्यायी)
हे सर्व जिन्नस चांगले मिसळून पेस्ट तयार करा. केस सुंदर बनवण्यासाठी हा हेअर मास्क मदत करेल. या नैसर्गिक घटकांमुळे केस आणखी सुंदर दिसतील.
advertisement
कोरियन हेअर पॅकमधे वापरले जाणारे नैसर्गिक घटक केस केवळ बाहेरूनच नव्हे तर आतूनही मजबूत करतात. अ‍ॅलोवेरा जेलमुळे टाळू हायड्रेटेड राहतो आणि कोंडा कमी होतो. अंड्यांमधील प्रथिनं केसांच्या वाढीला प्रोत्साहन देतात, नारळाचं तेल केस तुटण्यापासून रोखतं आणि केसांना चमकदार बनवतं. जिनसेंग पावडरमुळे केसांना पोषण मिळतं.
advertisement
हेअर पॅक लावण्याची योग्य पद्धत देखील खूप महत्वाची आहे. आधी, केस शाम्पूनं धुवा आणि थोडेसे वाळवा. हा हेअर पॅक टाळूला आणि केसांना पूर्णपणे लावा. केस झाकून ठेवा आणि कमीत कमी तीस मिनिटं तसंच राहू द्या. नंतर, थंड पाण्यानं धुवा. आठवड्यातून किमान एकदा तरी हा हेअर पॅक वापरा, आणि काही महिन्यांतच तुम्हाला केसांमधे फरक जाणवेल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : केसांच्या काळजीसाठी कोरियन हेअर पॅक, केसांचं सौंदर्य राहिल शाबूत, वाचा हेअर पॅक बनवण्याची कृती
Next Article
advertisement
Eknath Shinde BJP: पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....
पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद
  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

View All
advertisement