Hair Care : पांढऱ्या केसांवर हे उपाय नक्की करुन बघा, केस नैसर्गिकरीत्या राहतील काळे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केस अकाली पांढरे होत असतील तर घरी एक तेल बनवू शकता, हे तेल लावल्यानं केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण कमी होऊ शकेल. या तेलात आवळा, कढीपत्ता आणि भृंगराज या तीन आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर केला आहे.
मुंबई : केस पांढरे होणं ही समस्या पूर्वी चाळीस-पन्नास वर्षांच्या वयानंतर उद्भवत होती, पण आता वीस-पंचवीस वर्षांच्या वयातही केस पांढरे होऊ लागले आहेत. याला ताणतणाव, अयोग्य आहार, धूम्रपानाची सवय आणि जास्त रसायनं असलेल्या केसांच्या उत्पादनांचा वापर यासारखे घटक जबाबदार आहेत.
काही पद्धती वापरून, केस अकाली पांढरे होणं रोखता येणं शक्य आहे. आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांनी यासाठी एक पद्धत सांगितली आहे. डॉ. झैदी यांनी यूट्यूब चॅनलवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
केस अकाली पांढरे होत असतील तर घरी एक तेल बनवू शकता, हे तेल लावल्यानं केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण कमी होऊ शकेल. या तेलात आवळा, कढीपत्ता आणि भृंगराज या तीन आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर केला आहे.
advertisement
हे तेल बनवण्यासाठी एक कप नारळ तेल घ्या. त्यात दोन चमचे वाळलेल्या आवळ्याचे तुकडे घाला. नंतर तेलात मूठभर ताजा कढीपत्ता घाला. दोन चमचे भृंगराज पावडर घाला. आवळा आणि पाने काळी होईपर्यंत मंद आचेवर उकळवा. तेल तयार झालं की गाळून थंड करा.
आठवड्यातून तीन वेळा केसांच्या मुळांना हे तेल लावण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तेल रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी सौम्य शाम्पूनं धुवा.
advertisement
आहार आणि जीवनशैलीतील बदल - केवळ तेल लावल्यानं फरक पडणार नाही, आहाराकडे लक्ष देणं देखील महत्त्वाचं आहे. दररोज सकाळी एक चमचा भाजलेले काळे तीळ आणि एक ग्लास आवळ्याचा रस घ्या.
तसंच, आहारात खजूर, बदाम आणि पालक यांसारखे पदार्थ समाविष्ट करा, कारण त्यात व्हिटॅमिन बी 12, लोह आणि तांबं भरपूर प्रमाणात असतात. केस पांढरे होण्यास यामुळे प्रतिबंध होतो आणि केसांना मुळापासून मजबूत करण्यास मदत होते.
advertisement
केस कमी वयातच ताणतणावामुळे किंवा पोषणाच्या कमतरतेमुळे पांढरे झाले असतील, तर या उपायानं केवळ सात दिवसांत चांगले परिणाम मिळू शकतात. केस वाढत्या वयामुळे पांढरे झाले असतील, तर ते पूर्णपणे काळे करणं शक्य नाही. केस निरोगी, चमकदार आणि मजबूत करण्यासाठी आणि पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावण्यासाठी हे तेल नक्कीच वापरू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 5:55 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : पांढऱ्या केसांवर हे उपाय नक्की करुन बघा, केस नैसर्गिकरीत्या राहतील काळे