Calcium Deficiency : कॅल्शियमच्या कमतरतेचे शरीर देतं संकेत, हाडं होतील नाजूक, वेळीच घ्या काळजी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सर्वात आधी हाडांचं नुकसान होतं. शरीरात कॅल्शियमची कमतरता होते तेव्हा हाडं कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे हाडांची घनता कमी होते. दीर्घकाळात, यामुळे ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो, म्हणजेच हाडांची घनता कमी होते, हाडं ठिसूळ होतात. काही वेळा हाडं इतकी कमकुवत होतात की अगदी किरकोळ दुखापत देखील फ्रॅक्चर होऊ शकतं.
मुंबई : शरीराच्या स्वास्थ्यासाठी अनेक घटक आवश्यक असतात, तरंच शरीराचं कार्य व्यवस्थित सुरु राहतं. त्यातलाच एक घटक म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियम हे आपल्या शरीराच्या पायासारखं आहे. जेव्हा ते मजबूत असतं तेव्हा संपूर्ण इमारत स्थिर राहते, पण पाया कमकुवत असतो तेव्हा त्याचा तोल ढासळायला लागतो.
शरीरासाठी कॅल्शियमचं महत्त्व सांगणारी एक पोस्ट डॉ. शालिनी सिंह यांनी शेअर केली आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक नकारात्मक बदल होतात, जे वेळीच टाळणं अत्यंत महत्वाचं आहे. हाडं काचेसारखी नाजूक असतात.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सर्वात आधी हाडांचं नुकसान होतं. शरीरात कॅल्शियमची कमतरता होते तेव्हा हाडं कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे हाडांची घनता कमी होते. दीर्घकाळात, यामुळे ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो, म्हणजेच हाडांची घनता कमी होते, हाडं ठिसूळ होतात. काही वेळा हाडं इतकी कमकुवत होतात की अगदी किरकोळ दुखापत देखील फ्रॅक्चर होऊ शकतं.
advertisement
स्नायूंमधे वेदना - कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायूंमधे ताण आणि पेटके येतात. स्नायूंमधे पेटके विशेषतः रात्री आणि व्यायामादरम्यान येऊ शकतात. स्नायूंना विस्तारण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असतं आणि कमतरतेमुळे त्यांचं कार्य खराब होऊ शकतं.
दातांची चमक कमी होते - कॅल्शियमच्या कमतरतेचा थेट परिणाम दातांच्या आरोग्यावर होतो. दातांच्या इनॅमलमधे कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात कमकुवत होऊ शकतात आणि त्यांचा क्षय होऊ शकतो. शिवाय, हिरड्यांच्या आजाराचा धोका वाढतो.
advertisement
हृदयाचे ठोके अनियमित होतात - हृदयाच्या आरोग्यासाठी कॅल्शियम देखील आवश्यक आहे. या कमतरतेमुळे रक्तदाब अनियमित होऊ शकतो आणि हृदयाच्या लयीत अडथळा येऊ शकतो. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर होणाऱ्या या परिणामामुळे दीर्घकालीन गंभीर समस्या उद्भवू शकतात.
advertisement
मेंदूवर परिणाम होतो - कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती कमी होणं, चिडचिड होणं आणि निद्रानाश होऊ शकतो. न्यूरोलॉजिकल लक्षणांमधे सुस्ती आणि एकाग्रतेचा अभाव यांचा समावेश आहे.
कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी उपाय -
कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी, दूध, दही, चीज, पालक, संत्री आणि बदाम खाण्यास सुरुवात करा.
कॅल्शियमयुक्त आहार घ्या आणि गरज पडली तर सप्लिमेंटससाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम अत्यावश्यक आहे, हे कायम लक्षात ठेवा.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 9:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Calcium Deficiency : कॅल्शियमच्या कमतरतेचे शरीर देतं संकेत, हाडं होतील नाजूक, वेळीच घ्या काळजी