Agarbatti : उदबत्तीच्या काड्यांनी होतं तब्येतीचं मोठं नुकसान, फुफ्फुसरोगतज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Last Updated:

घरात लहान मुलं, वृद्ध किंवा दम्याचे रुग्ण असतील तर उदबत्तीचा धूर त्यांच्यासाठी आणखी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास, खोकला किंवा अ‍ॅलर्जी होऊ शकते.

News18
News18
मुंबई : भारतात घराघरात सकाळी पूजेच्या वेळी आणि संध्याकाळी दिवा लावताना अगरबत्ती लावतात. तुम्हीही दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थनेदरम्यान अगरबत्ती पेटवत असाल तर ही माहिती आधी वाचा. या सुगंधामुळे शांत आणि प्रसन्न वाटू शकतं पण हीच अगरबत्ती आरोग्याला हळूहळू गंभीर नुकसान पोहोचवू शकते.
तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण याबद्दल फुफ्फुसरोगतज्ज्ञ काय म्हणतात ते पाहूया. फुफ्फुसरोगतज्ज्ञ सोनिया गोयल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली आहे. अगरबत्ती जाळण्यामुळे होणारं संभाव्य नुकसान आणि प्रतिबंधात्मक उपाय कोणते पाहूयात.
advertisement
अगरबत्ती का लावू नये ? - अगरबत्तीमुळे घरातील हवा प्रदूषित होते. अगरबत्ती जाळल्यावर निघणारा धूर PM2.5 कण, कार्बन मोनोऑक्साइड आणि हानिकारक वायू बाहेर टाकतो. हे प्रदूषक घरातील हवा प्रदूषित करतात. दीर्घकाळ श्वास घेतल्यानं आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.
हा धूर सिगारेटच्या धुराइतकाच धोकादायक असतो. एक अगरबत्ती जाळल्यानं सिगरेट ओढण्याइतकाच धूर निघतो. त्यामुळे तुम्ही जर रोज एक अगरबत्ती लावत असाल तर त्याचा परिणाम धूम्रपानासारखाच होतो असं अनेक अभ्यासातून आढळून आलं आहे.
advertisement
हा धूर मुलं आणि वृद्धांसाठी अधिक हानिकारक आहे. घरात लहान मुलं, वृद्ध किंवा दम्याचे रुग्ण असतील तर उदबत्तीचा धूर त्यांच्यासाठी आणखी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास, खोकला किंवा अ‍ॅलर्जी होऊ शकते.
अगरबत्ती दररोज वापरल्यानं धोका वाढतो, बंद खोलीत दररोज अगरबत्ती जाळल्यानं हळूहळू ब्राँकायटिस, दमा आणि सीओपीडीसारखे आजार होऊ शकतात. अगरबत्तीचा दीर्घकाळ वापर होत असेल तर फुफ्फुसांचा कर्करोग देखील होऊ शकतो.
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा
प्रार्थनेदरम्यान अगरबत्ती लावायला आवडत असेल तर ते रोज न करता अधूनमधून लावत जा. पण हे करताना, खोलीची खिडकी उघडी आहे किंवा पंखा चालू आहे याची खात्री करा जेणेकरून धूर बाहेर पडू शकेल. दररोज सुगंध किंवा आध्यात्मिक वातावरण हवं असेल तर डिफ्यूझर, विद्युत दिवा किंवा नैसर्गिक धूप वापरण्याचा विचार करा. हे पर्याय सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल ठरु शकतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Agarbatti : उदबत्तीच्या काड्यांनी होतं तब्येतीचं मोठं नुकसान, फुफ्फुसरोगतज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement