Hair Loss : केस गळतीवर नैसर्गिक उपाय, आयुर्वेद हेअर पॅक करेल केस गळती कमी, केस होतील मुलायम

Last Updated:

केस गळणं आणि कोंडा अशा प्रत्येक समस्येवर आयुर्वेदात उपाय आहेत. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, मेथीचे दाणे, कलौंजी, जवस आणि लवंगापासून बनवलेला हेअर पॅक लावला तर केसांना चांगलं खोलवर पोषण मिळतं. आणि ते मजबूत, रेशमी होतात.

News18
News18
मुंबई : केस कमकुवत आणि निर्जीव होत असतील तर काही नैसर्गिक चांगले उपाय उपलब्ध आहेत. कारण ताण, प्रदूषण आणि रसायन असलेल्या केसांच्या उत्पादनांमुळे अशा समस्या वाढतायत.
अनेकदा, रसायनं केसांना फायदेशीर ठरण्यापेक्षा जास्त नुकसानकारक ठरू शकतात. अशा उत्पादनांनी तुमचेही केस खराब झाले असतील, तर आयुर्वेदिक घरगुती उपचारांचा वापर करा.
केस गळणं आणि कोंडा अशा प्रत्येक समस्येवर आयुर्वेदात उपाय आहेत. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, मेथीचे दाणे, कलौंजी, जवस आणि लवंगापासून बनवलेला हेअर पॅक लावला तर केसांना चांगलं खोलवर पोषण मिळतं. आणि ते मजबूत, रेशमी होतात.
advertisement
मेथीचे दाणे, कलौंजी, जवस, लवंगा, व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे सर्व साहित्य मिक्सरमधे बारीक करून त्याची जाडसर पावडर बनवा. एका पॅनमधे पाणी गरम करा, त्यात पावडर घाला आणि उकळी आणा. मिश्रण घट्ट आणि चिकट झाल्यावर ते कापडातून गाळून घ्या. व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला आणि चांगलं मिसळून घ्या. हे मिश्रण केसांना आणि टाळूला लावा आणि चाळीस मिनिटं तसंच राहू द्या. सौम्य शाम्पूनं केस धुवा.
advertisement
मेथीच्या दाण्यांमुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि कोंडा कमी करतात.
कलौंजीमुळे केस गळणं आणि अकाली पांढरे होणं थांबतं.
अळशीच्या बियांमधे ओमेगा-३ फॅटी एसिड असतं. यामुळे केस मॉइश्चरायझ होतात आणि गुळगुळीत होतात.
लवंगेमुळे टाळूमधे रक्ताभिसरण वाढवून नवीन केसांच्या वाढीला प्रोत्साहन मिळतं. आठवड्यातून एक दोन वेळा हा उपाय केल्यानं केस मजबूत, लांब आणि चमकदार होण्यास मदत होईल. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Loss : केस गळतीवर नैसर्गिक उपाय, आयुर्वेद हेअर पॅक करेल केस गळती कमी, केस होतील मुलायम
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement