Sleep : गाढ आणि शांत झोपेसाठी खास रेसिपी, हे जिन्नस करतील झोपेच्या समस्या दूर

Last Updated:

गाढ आणि शांत झोप शरीर आणि मन दोघांसाठीही आवश्यक आहे. वारंवार झोप न येण्याचा त्रास होत असेल,  तर आयुर्वेदिक दुधाची रेसिपी उपयुक्त ठरू शकते. जायफळ, खसखस, वेलची यासारखे जिन्नस वापरुन हे दूध तयार करता येतं.

News18
News18
मुंबई : पुढचा दिवस चांगला जाण्यासाठी रात्रीची झोप महत्त्वाची असते पण आदल्या रात्री नीट झोप झाली नाही की त्याचे परिणाम नंतर जाणवत राहतात. धावपळीच्या जीवनात झोपेच्या समस्यांचं प्रमाण वाढलंय. बरेच जण रात्री लवकर झोप येत नाही अशी तक्रार करतात. झोप लागली तरी वारंवार उठतात, गाढ झोप येत नाही किंवा सकाळी थकल्यासारखं वाटतं.
advertisement
तुम्हालाही अशाच समस्या जाणवत असतील, तर ही माहिती नक्की महत्त्वाची आहे. अलिकडेच, आयुर्वेदिक पोषणतज्ज्ञ श्वेता शाह यांनी झोप चांगली येण्यासाठी एक घरगुती उपाय सांगितला आहे. झोपेचं चक्र बिघडलं असेल, नीट झोप येत नसेल, रात्री वारंवार जागे होत असाल, गाढ झोप येत नसेल किंवा सकाळी लगेच झोप येत असेल, तर झोपण्यापूर्वी दूध पिणं हा चांगला पर्याय आहे. हे दूध तयार करण्याची कृती पाहूयात.
advertisement
शंभर मिली दूध, एक टीस्पून शुद्ध तूप, पाव टीस्पून जायफळ, केशराचे दोन धागे, अर्धा चमचा साखर, 1-2 वेलची आणि पाव टीस्पून खसखस हे साहित्य काढून ठेवा. दूध तयार करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. आधी दूध थोडं गरम करा. नंतर सर्व साहित्य एक-एक करून घाला आणि मंद आचेवर उकळी आणा. दूध सुमारे अर्ध होईपर्यंत उकळू द्या. थोडं कोमट असतानाच प्या.
advertisement
चांगल्या झोपेसाठी दुधाचे फायदे -
जायफळात नैसर्गिक झोप आणणारे गुणधर्म असतात, यामुळे मन शांत राहतं आणि गाढ झोप येण्यासाठी मदत होते.
खसखस शरीराला आराम देते आणि चिंता कमी करते.
केसर आणि वेलची केवळ चव आणि सुगंध वाढवत नाहीत तर मूड देखील सुधारतात.
देशी तूप आणि दूध एकत्रितपणे शरीराचं पोषण करतात आणि पचन सुधारतात.
advertisement
झोपण्यापूर्वी सुमारे एक ते सव्वा तास आधी हे दूध पिणं चांगलं. हे दूध नियमितपणे पिण्यानं झोपेची गुणवत्ता सुधारेल आणि सकाळी फ्रेश वाटेल.
हा उपाय प्रभावी असला तरी काही गोष्टी लक्षात ठेवा असा सल्ला त्यांनी दिला आहे. ज्यांना दूध पचवण्यास त्रास होतो त्यांनी थोड्या प्रमाणात दूध प्यावं. कोणतीही ऍलर्जी किंवा गंभीर आरोग्य समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
advertisement
गाढ आणि शांत झोप शरीर आणि मन दोघांसाठीही आवश्यक आहे. वारंवार झोप न येण्याचा त्रास होत असेल,  तर ही आयुर्वेदिक दुधाची रेसिपी उपयुक्त ठरू शकते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sleep : गाढ आणि शांत झोपेसाठी खास रेसिपी, हे जिन्नस करतील झोपेच्या समस्या दूर
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement