दिवसाची निरोगी आणि सकारात्मक सुरुवात आपल्या शरीराला ऊर्जावान ठेवते. सकाळ म्हणजेच दिवसातला महत्त्वाचा पहिला भाग मज्जासंस्थेसाठी महत्त्वाचा असतो. याबाबत संशोधनही करण्यात आलं. आतड्यांसंबंधीच्या आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही कॉफी, चहा प्या, किंवा ईमेल पाहत किंवा मोबाईल स्क्रोलिंग करता करता दिवसाची सुरुवात करा पण याआधीच शरीरानं त्याची लय निश्चित केलेली असते. या वेळेचा सुज्ञपणे वापर केल्यानं मज्जासंस्था, पचन आणि चयापचयावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात.
advertisement
Winter Care : छोटीशी गोळी घेईल घशाची काळजी, घसादुखीवर या उपायानं करा मात
यासाठी एक दोन तासांची नाही; तर केवळ दहा मिनिटांची दिनचर्या पुरेशी आहे. ही दहा मिनिटांची सकाळची दिनचर्या निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी कशी प्रभावी आहे ते समजून घेऊया.
हळूहळू श्वास घ्या - पहिली तीन मिनिटं हळूहळू आणि खोल श्वास घ्या. जलद आणि उथळ श्वासोच्छवासामुळे शरीरावर ताण येतो, ज्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. हळूहळू श्वास घेतल्यानं पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते, ज्यामुळे शरीर शांत होतं आणि पचन सुधारतं. ही खोल श्वास सोडण्याची पद्धत ताण संप्रेरक कमी करते आणि आतड्यांना अन्नासाठी तयार करते. अॅरिझोना सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह मेडिसिनचे संस्थापक डॉ. अँड्र्यू वेइल यांच्या संशोधनातून हे निदर्शनास आलं.
हलकी हालचाल - पुढची दोन ते तीन मिनिटं थोडं स्ट्रेचिंग किंवा थोडं चाला. यामुळे मेंदू, हृदय आणि पचनसंस्थेला जोडणारी व्हॅगस नर्व्ह सक्रिय होते. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट आणि फायबर फ्युएल्डचे लेखक डॉ. विल बुल्सिविझ यांच्या मते, हालचालीमुळे आतड्यांची हालचाल सुधारून पचनाला मदत होते.
Fruits for Skin : हिवाळ्यातही त्वचा दिसेल चमकदार, समजून घेऊया फळांचं महत्त्व
हलक्या हालचालीमुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि पोट फुगण्याचं प्रमाण कमी होतं. पाठीच्या कण्यासाठीचे काही व्यायाम करणं किंवा थोडं चालणं पुरेसं आहे.
हायड्रेशन - सातव्या ते आठव्या मिनिटांच्या दरम्यान पाणी प्या. झोपून उठल्यानंतर शरीराला पुन्हा हायड्रेट करणं महत्वाचं आहे. कॅफिन घेण्यापूर्वी पाणी पिणं चांगलं, कारण रिकाम्या पोटी कॉफीमुळे ताण वाढण्याची शक्यता असते. कोमट किंवा साधं पाणी पिणं हा उत्तम पर्याय आहे.
