हार्ट अटॅक हा आनुवंशिक असू शकतो का? आईवडिलांना हार्टची समस्या असेल तर त्यांच्या मुलांनाही हार्ट अटॅकचा धोका असतो का? याबाबत मध्य प्रदेशच्या रेवा येथील एका प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांनी खूप महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारतीयांचं हृदय धोक्यात! फॉरेनर्सपेक्षा हार्ट अटॅकचा जास्त धोका, डॉक्टरांनी सांगितलं कारण
हृदयरोगतज्ज्ञ, सुपर स्पेशालिटी कार्डिओलॉजिस्ट, डॉ. एस.के. त्रिपाठी म्हणाले की जर तुमच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले किंवा छातीत तीव्र वेदना होत असतील तर ते एक धोक्याचं लक्षण म्हणून घ्या आणि ताबडतोब तुमचं हृदय तपासा. जर एखाद्या व्यक्तीला थोडंसं काम केल्यानंतर किंवा पायऱ्या चढल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छातीत दुखत असेल किंवा डाव्या हातात किंवा त्याच्या आजूबाजूला खांद्यावर किंवा पोटाच्या भागात वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता स्वतःची तपासणी करून घ्यावी.
advertisement
डॉ. एस.के. त्रिपाठी म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीच्या आई किंवा वडिलांना हृदयरोग असेल तर त्या व्यक्तीला हृदयरोगाचा धोका असतो. अशा परिस्थितीत, अशा लोकांनी त्यांची जीवनशैली निरोगी ठेवण्यासोबतच वयाच्या 35 व्या वर्षानंतर दर 3 वर्षांनी त्यांची नियमित तपासणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
Heart Attack : हार्ट अटॅक आल्यानंतर छातीवर किती वेळा दाब द्यावा, CPR देण्याचे नियम काय?
आहाराकडे लक्ष देणं महत्त्वाचं
डॉ. त्रिपाठी म्हणाले की, व्यस्त जीवनशैलीमुळे अनियमित आहार, जंक फूड खाणे किंवा जास्त मसालेदार अन्न खाणं यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही शारीरिक कमतरता असते. परंतु त्या कमतरतेची जाणीव त्या व्यक्तीला नसते. शरीराला आवश्यक पोषक तत्वांची आवश्यकता असते, परंतु जास्त तेल आणि मसाले असलेले जंक फूड खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य देखील बिघडतं.
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असतात, म्हणून अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.)