भारतीयांचं हृदय धोक्यात! फॉरेनर्सपेक्षा हार्ट अटॅकचा जास्त धोका, डॉक्टरांनी सांगितलं कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Heart Attack Reason : परदेशी लोकांपेक्षा भारतीयांना हृदयाशी संबंधित आजार आणि हृदयविकाराचे झटके जास्त आहेत. यामागील प्रमुख कारण काय ते डॉक्टरांनी सांगितलं आहे.
नवी दिल्ली : तसा आजार काही ठिकाण किंवा देश वगैरे पाहून येत नाही. हार्ट अटॅक कधी कुणाला कसा कुठे येईल सांगू शकत नाही. पण तुम्हाला फॉरेनर्सपेक्षा भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका जास्त आहे, असं सांगितलं तर... साहजिकच धक्का बसला असेल. पण असं खरंच आहे आणि यामागील कारणही डॉक्टरांनी सांगितलं आहे.
आजकाल हृदयविकार वेगाने वाढत आहेत. विशेषतः भारतात लठ्ठपणा, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वाईट जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका सतत वाढत आहे. तथापि जर आपण भारतीय आणि परदेशी लोकांची तुलना केली तर भारतीयांमध्ये हा धोका जास्त दिसून येतो.
याबाबत स्थूलता तज्ज्ञ डॉ. शिप्रा माथूर म्हणाल्या की, भारतीयांच्या रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या पातळ असतात. त्यामुळे रक्त गोठण्याची म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या लवकर तयार होण्याची शक्यता वाढते. जेव्हा रक्ताची गुठळी तयार होते तेव्हा ती रक्तप्रवाह थांबवू शकते आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकते. दुसरीकडे, पाश्चात्य देशांतील लोकांच्या रक्तवाहिन्या तुलनेने रुंद असतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये रक्त गोठण्याची शक्यता कमी असते. या कारणास्तव, भारतीयांच्या तुलनेत परदेशात हृदयविकाराचं प्रमाण कमी असतं.
advertisement
लठ्ठपणा हे देखील हृदयविकाराचा धोका वाढवण्याचं एक मोठं कारण आहे. जास्त वजनामुळे शरीरात कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. याचा रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि हृदयावर जास्त दबाव येतो.
हे कसं टाळायचं?
निरोगी आहार असणं खूप महत्त्वाचं आहे. जंक फूड टाळा आणि आहारात हिरव्या भाज्या, फळे, काजू आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करा.
advertisement
दररोजच्या व्यायामामुळे हृदय मजबूत राहतं. म्हणून चालणं, योगा आणि कार्डिओ एक्सरसाइझ यांचा दैनंदिन दिनचर्येत समावेश केला पाहिजे.
वजन नियंत्रित करणंदेखील महत्त्वाचं आहे. कारण लठ्ठपणा हा हृदयासाठी सर्वात मोठा धोका आहे.
धूम्रपान आणि मद्यपान टाळावं, कारण या सवयी हृदयाला कमकुवत करतात आणि रक्तदाब वाढवतात.
advertisement
वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि साखरेची पातळी नियंत्रित करता येईल.
Location :
Delhi
First Published :
July 16, 2025 1:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
भारतीयांचं हृदय धोक्यात! फॉरेनर्सपेक्षा हार्ट अटॅकचा जास्त धोका, डॉक्टरांनी सांगितलं कारण