जर्नल नेचरमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. हा अभ्यास ऑक्टोबर 2021 ते जुलै 2024 दरम्यान महावीर कर्करोग संस्थेचे डॉ. अरुण कुमार आणि प्राध्यापक अशोक घोष यांच्या नेतृत्वात नवी दिल्लीतील एम्सचे डॉ. अशोक शर्मा यांच्या सहकार्याने करण्यात आला. अभ्यासात असं दिसून आलं आहे की बिहार राज्यातील सहा जिल्ह्यांमधील प्रत्येक स्तनपान करणाऱ्या महिलेच्या दुधात युरेनियम आढळून आलं आहे.
advertisement
अभ्यासात काय आढळलं?
या अभ्यासाअंतर्गत भोजपूर, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, कटिहार आणि नालंदा येथील 17 ते 35 वयोगटातील 40 महिलांच्या आईच्या दुधाचे नमुने तपासण्यात आले. धक्कादायक म्हणजे सर्व नमुन्यांमध्ये युरेनियम (U238) आढळून आलं. कोणत्याही देशाने किंवा संस्थेने आईच्या दुधात युरेनियमची सुरक्षित मर्यादा ठरवलेली नाही, म्हणजेच कोणतंही प्रमाण वैज्ञानिकदृष्ट्या सुरक्षित मानलं जात नाही.
Pregnancy : प्रेग्नंट होण्यासाठी किती वेळा शारीरिक संंबंध ठेवावे लागतात, कितीदा ट्राय करावं?
अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जवळजवळ 70% मुलांना अशा पातळीचा सामना करावा लागला ज्यामुळे गंभीर आजाराचे धोके निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञ म्हणतात की सर्वात मोठा धोका अशा मुलांसाठी आहे ज्यांचे अवयव अद्याप विकसित होत आहेत. त्यांचं शरीर जड धातू लवकर शोषून घेतं आणि त्यांच्या कमी वजनामुळे, अगदी कमी प्रमाणात देखील गंभीर नुकसान होऊ शकते.
युरेनियम आईच्या दुधात पोहोचलं कसं?
या अभ्यासाचे सह-लेखक एम्सचे डॉ. अशोक शर्मा म्हणाले, युरेनियम अन्नसाखळीत प्रवेश करत आहे आणि कर्करोग, न्यूरोलॉजिकल रोग आणि बाल विकासावर परिणाम करत आहे ही गंभीर चिंतेची बाब आहे. युरेनियम पाण्यात कुठून पोहोचलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आम्हाला स्रोत माहित नाही. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण देखील कारणाचा तपास करत आहे.
आईने थंड दही खाल्लं तर तिचं दूध पिणाऱ्या बाळाला सर्दी होते? डॉक्टर काय सांगतात?
पण हा धोका असला तरी मातांनी आपल्या बाळांना स्तनपान थांबवू नये. बाळाच्या प्रतिकारशक्ती आणि विकासासाठी आईचं दूध आवश्यक आहे आणि त्याला पर्याय नाही. ते फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच थांबवावं, असं शास्त्रज्ञांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
