आपल्या आजूबाजूला सर्व प्रकारचे बॅक्टेरिया असतात. यापैकी काही आपल्यासाठी चांगले आहेत तर काही वाईट आहेत. चीनच्या तियांगोंग अंतराळ स्थानकावर शास्त्रज्ञांना एक जीवाणू सापडला आहे, जो खूप रहस्यमय आहे. या शोधामुळे अंतराळवीरांच्या आरोग्याबाबत मोठा प्रश्न निर्माण होत आहे. हे जीवाणू कुठून आले आणि ते अंतराळात राहणाऱ्यांसाठी धोका निर्माण करू शकते का?
advertisement
कोणता आहे बॅक्टेरिया?
द सनच्या वृत्तानुसार, या जीवाणूचं नाव नोव्होहर्बासिलम टियांगोंगेन्सिस (एन. टियांगोंगेन्सिस) आहे. शेन्झोउ स्पेस बायोटेक्नॉलॉजी ग्रुप आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्पेसक्राफ्ट सिस्टम इंजिनिअरिंगच्या शास्त्रज्ञांच्या मते, हे जीवाणू तियांगोंगपर्यंत कसं पोहोचलं हे अजूनही एक गूढ आहे. ते पृथ्वीवरून बीजाणू म्हणून प्रवास करत होते की ते अंतराळ स्थानकाच्या विशेष वातावरणात उद्भवले? याचं उत्तर अद्याप शास्त्रज्ञांकडे नाही.
भारतात थैमान घालणारा कोरोना NB.1.8.1, नवं रूप इतकं भयानक?, WHO नेही घातलं लक्ष
एका मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये अलीकडेच प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हे नवीन जीवाणू जिलेटिनचे विघटन करू शकतात आणि त्यातून नायट्रोजन आणि कार्बन काढू शकतात. ही खासियत त्याला अद्वितीय बनवते. यामुळे हा जीवाणू कठीण परिस्थितीतही स्वतःभोवती एक मजबूत संरक्षणात्मक कवच तयार करतो.
पृथ्वीवरही याची प्रजाती
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या जीवाणूची एक प्रजाती पृथ्वीवर देखील अस्तित्वात आहे, जी कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये सेप्सिससारखा धोकादायक आजार पसरवू शकते. पृथ्वीवर असलेले या प्रजातीचे जीवाणू इतर गोष्टी खाऊन जगतात, परंतु अंतराळातील हे जीवाणू फक्त जिलेटिनवर अवलंबून असतात. ही नवीन शक्ती आणि त्याच्या सापेक्षतेचे धोकादायक स्वरूप पाहून, शास्त्रज्ञांना काळजी वाटते की यामुळे अंतराळवीरांना त्रास होऊ शकतो.
तियांगोंग अंतराळ स्थानकावरील अंतराळवीर नियमितपणे पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण करतात आणि बॅक्टेरियांवर बारकाईने लक्ष ठेवतात. हवा स्वच्छ करण्यासाठी स्टेशनमध्ये विशेष फिल्टर सिस्टम देखील बसवण्यात आल्या आहेत. तरीही पृथ्वीप्रमाणेच अंतराळातही बॅक्टेरियामुळे होणारे आजार पूर्णपणे रोखणं कठीण आहे. आता N. tiangongensis बॅक्टेरियाबद्दल प्रश्न असा आहे की ते नवीन समस्या निर्माण करेल की फक्त एक अद्वितीय वैज्ञानिक शोध आहे. हे हळूहळू स्पष्ट होईल.