अपस्मार किंवा मिर्गी किंवा फिट येणं हे मुख्यत: मेंदूशी संबंधित आहे. मेंदूंशी संबंधित क्रियेत अडथळा आल्यानं हा त्रास जाणवू शकतो.
अपस्माराचे झटके येतात तेव्हा अनेकदा शरीर जोरात थरथरणं, शरीर कडक होणं आणि बेशुद्ध होणं असे प्रकार घडतात. अनेकदा सौम्य झटके येतात. अचानक घाबरणं, थोड्या वेळासाठी बेशुद्ध होणं, विचित्र भावना किंवा वारंवार हालचाली होतात. ही सूक्ष्म लक्षणं ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण ती अनेकदा दुर्लक्षित केली जातात, ज्यामुळे उपचारांना विलंब होतो.
advertisement
Uric Acid: अति प्रथिनांमुळे वाढतं युरिक अॅसिड, ही आहेत अॅसिड वाढल्याची लक्षणं
काही लोकांमधे ताणतणाव, झोपेचा अभाव किंवा भीतीमुळे झटके येऊ शकतात, परंतु त्यामुळे अपस्मार होत नाही. इतर कारणांमधे डोक्याला दुखापतीमुळे, मेंदूतल्या संसर्गामुळे, स्ट्रोक, ट्यूमरमुळे, इलेक्ट्रोलाइट असंतुलनामुळे किंवा मेंदूतील संरचनात्मक समस्यांमुळे हा त्रास जाणवू शकतो.
योग्य औषधं किंवा आवश्यक असल्यास शस्त्रक्रियेनं, बहुतेक रुग्णांना त्यांच्या झटक्यांवर जवळजवळ पूर्ण नियंत्रण मिळतं. ते वाचू आणि लिहू शकतात, काम करू शकतात आणि प्रवासही करू शकतात आणि सामान्य जीवन जगू शकतो.
पोहणे किंवा पॅराग्लायडिंग टाळणं अशी सावधगिरी बाळगून आणि योग्य औषधं वेळेवर घेऊन दैनंदिन जीवन जगणं शक्य आहे.
झटक्यादरम्यान व्यक्तीच्या तोंडात काहीतरी घालणं असे प्रकार तुम्हीही पाहिले असतील पण असं करणं
चुकीचं आहे तसंच खूप धोकादायक देखील असू शकतं. झटक्या असलेल्या व्यक्तीला कधीही धरू नका किंवा कोणतीही वस्तू (चमचा, चावी, बोट इ.) त्यांच्या तोंडात घालू नका.
योग्य मार्ग म्हणजे त्यांना दुखापत झालेल्या भागापासून दूर हलवणे, त्यांना हळूवारपणे त्यांच्या बाजूला वळवणं आणि झटका कमी होईपर्यंत जवळच राहणं.
अपस्मार संसर्गजन्य नाही. अपस्मार असलेल्या व्यक्तीकडून लक्षणं पसरतं नाहीत. पण, विषाणूजन्य संसर्ग किंवा क्षयरोग यासारखे काही संसर्ग वातावरणातून होऊ शकतात आणि ते नंतर मेंदूवर परिणाम करू शकते, परंतु एपिलेप्सी संसर्गजन्य नाही.
Vision Loss: डायबिटिस आहे? डोळ्यांची काळजी घ्या, या हेल्थ टिप्स जरुर वाचा
जास्त चमकणारे दिवे किंवा स्क्रीनमुळे झटके येतात असं अनेकांना वाटतं पण हे अगदी कमी टक्के लोकांबाबतच खरं आहे. अपस्मार असलेल्या फक्त तीन टक्के लोकांना प्रखर दिवे किंवा दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहण्यामुळे समस्या येतात. म्हणून, सामान्य परिस्थितीत, स्क्रीन पाहणं किंवा गेम खेळणे पूर्णपणे सुरक्षित आहे. पण यासाठी आवश्यकतेनुसार ब्रेक घेणं गरजेचं आहे.
योग्य उपचार आणि नियमित औषधोपचारानं झटके नियंत्रणात आल्यावर, बरेच लोक गाडी चालवू शकतात. पण प्रत्येक देशाचे कायदे वेगळे असतात, ही बाब लक्षात ठेवायला हवी.
अपस्मार किंवा मिर्गी येणं किंवा फेफरं येणं या स्थितीत घाबरून जाण्याऐवजी समजून घेणं गरजेचं आहे.
जेव्हा आपण मिथकांपेक्षा विज्ञानावर अवलंबून राहू तेव्हाच अपस्माराशी संबंधित भीती, लाज आणि भेदभाव कमी होऊ शकतो आणि लाखो लोक सामान्य, सन्माननीय आणि आनंदी जीवन जगू शकतात.
