Vision Loss : मधुमेह - रक्तदाब असलेल्यांसाठी मोलाचा सल्ला, डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
रक्तातील साखरेतील थोडासा बदल देखील डोळयातील पडदा आणि त्याच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करू शकतो. रक्तदाब आणि रक्तातील साखरेतील बदल डोळ्यांवर कसा परिणाम करतात ते पाहूया:
मुंबई : सध्या मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब होणं आणि हे दोन्ही अनियंत्रित होणं प्रकृतीसाठी धोकादायक आहे.
या दोन्ही आरोग्य समस्या नियंत्रित करण्यासाठी औषधोपचारांची आवश्यकता असते. रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण आरोग्यावर त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. या दोन्ही परिस्थिती डोळ्यांसाठी विशेषतः धोकादायक असू शकतात.
रक्तातील साखरेतील थोडासा बदल देखील डोळयातील पडदा आणि त्याच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करू शकतो. रक्तदाब आणि रक्तातील साखरेतील बदल डोळ्यांवर कसा परिणाम करतात ते पाहूया:
advertisement
रक्तातील साखरेचा डोळ्यांवर होणारा परिणाम -
मॅक्युलर एडेमा - उच्च रक्तातील साखरेमुळे डोळ्यातील रक्तवाहिन्यांमधून गळती होऊ शकते, ज्यामुळे मॅक्युलर एडेमा नावाची स्थिती उद्भवू शकते.
इस्केमिया - काही वेळा, रक्तातील साखरेच्या वाढलेल्या पातळीमुळे या रक्तवाहिन्या ब्लॉक देखील होऊ शकतात. याला इस्केमिया म्हणतात आणि यामुळे किंवा रेटिनाला पुरेसं रक्त न मिळाल्यामुळे, शरीर नवीन रक्तवाहिन्या तयार करू लागतं, ज्या सहसा निरोगी नसतात. या रक्तवाहिन्यांमधून रक्तस्त्राव सुरू राहतो, ज्यामुळे डोळ्यात रक्तस्त्राव होतो. यावर वेळीच नियंत्रण आणि उपचार केले नाहीत तर यामुळे दृष्टी कमी होऊ शकते.
advertisement
रक्तदाब आणि डोळ्यांमधील संबंध - मधुमेहाप्रमाणेच रक्तदाबामुळेही डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं. रेटिनातील रक्तवाहिन्या खूप पातळ असतात आणि जर जास्त दाबानं त्यातून रक्त वाहत असेल तर ब्लॉकेज होण्याचा धोका असतो. रक्तवाहिन्या ब्लॉक होतात तेव्हा व्हेन ऑक्लुजन किंवा आर्टरीचं ऑक्लुजन सारख्या परिस्थिती उद्भवू शकतात.
advertisement
महत्त्वाचं म्हणजे, नसा ब्लॉक झाल्या तरीही लेसर किंवा इंजेक्शननं त्यावर उपचार केले जाऊ शकतात. पण, रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या असतील तर उपचार थोडे कठीण असतात कारण बहुतेक वेळा, रक्तपुरवठा पूर्णपणे खंडित होतो आणि कायमची दृष्टी कमी होण्याची शक्यता खूप जास्त असते.
AION म्हणजेच Anterior Ischemic Optic Neuropathy. यामधे, डोळा आणि मेंदूला जोडणाऱ्या ऑप्टिक नर्व्हला रक्तपुरवठा रोखला जातो. उच्च रक्तदाब आणि रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे होऊ शकतो.
advertisement
याबद्दल डॉक्टरांशी नक्की संवाद साधा, त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 2:26 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vision Loss : मधुमेह - रक्तदाब असलेल्यांसाठी मोलाचा सल्ला, डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा


