Skin Care : निस्तेज चेहरा दिसेल फ्रेश, त्वचेसाठी उपयुक्त टोमॅटो, जाणून घ्या कसा करायचा वापर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
त्वचेचा पोत चांगला करण्याबरोबरच टोमॅटोमुळे चेहऱ्यावरचे डागही कमी होतात. त्वचेसाठी टोमॅटोचा वापर कसा करायचा समजावून घेऊया.
मुंबई : चेहरा फ्रेश दिसावा यासाठी एका नैसर्गिक उपायाविषयी जाणून घेऊया. घरी हमखास मिळणारा टोमॅटो त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचेवरचा तजेला कायम राहतो. चेहरा निर्जीव वाटत असेल तर टोमॅटो वापरल्यानं त्वचा सतेज होते.
त्वचेचा पोत चांगला करण्याबरोबरच टोमॅटोमुळे चेहऱ्यावरचे डागही कमी होतात. त्वचेसाठी टोमॅटोचा वापर कसा करायचा समजावून घेऊया.
टोमॅटोमधे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, त्वचेचा पोत चांगला करण्याबरोबरच डाग कमी करण्यास देखील टोमॅटो उपयोगी ठरतात. त्यात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, त्वचेसाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो. टोमॅटोमुळे चेहऱ्यावरची छिद्र स्वच्छ होतात.
advertisement
याव्यतिरिक्त, टोमॅटोमधे पाणी असतं, जे त्वचेला हायड्रेट करतं. व्हिटॅमिन सी आणि लायकोपिन निस्तेजपणा कमी करतात आणि नैसर्गिक चमक वाढवतात.
टोमॅटो फेस पॅक - त्वचेला उजळ करण्यासाठी टोमॅटोचा फेस पॅक तयार करा आणि तो लावा. टोमॅटोचा फेस पॅक बनवण्यासाठी टोमॅटो बारीक करून त्याचा रस काढा. त्यात एक चमचा दही किंवा मध घाला. हे मिश्रण चांगलं मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. पंधरा - वीस मिनिटांनी चेहरा धुवा. टोमॅटो फेस पॅकमुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.
advertisement
टोमॅटोचा वापर स्क्रब म्हणूनही करता येतो. टोमॅटो फेस स्क्रब बनवण्यासाठी, टोमॅटोच्या गरात बेसन किंवा थोडी साखर मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर मसाज करा. वीस मिनिटं तसंच राहू द्या आणि पाण्यानं धुवा. यामुळे मृत त्वचेच्या पेशी निघून जाण्यास मदत होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 12:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : निस्तेज चेहरा दिसेल फ्रेश, त्वचेसाठी उपयुक्त टोमॅटो, जाणून घ्या कसा करायचा वापर


