advertisement

माणूसकीला काळिमा! पार्वतीबाई घरात एकट्या, गावातील महिलेच्या मनात शिरला सैतान; पुढे जे केलं भयकंर

Last Updated:

Bhiwadi Crime : एकाच परिसरातील किंवा एकाच गावातील असलेल्या नागरिकांवर विश्वास जास्त असतो. मात्र असं काही घडतं तेव्हा सर्वजण हादरुन जातात, असा काहीसा प्रकार भिवंडीतून समोर आलेला आहे.

दागिने चोरीच्या उद्देशाने वृद्धेला मारण्याचा प्रयत्न
दागिने चोरीच्या उद्देशाने वृद्धेला मारण्याचा प्रयत्न
भिवंडी : भिवंडी शहरातून अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आलेली आहे. जिथं गावातील महिलेने वृद्ध महिलेसोबत केलं भयानक कांड केलं आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खबळबळ उडाली आहे.
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिला गोडे (वय35) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव असून पार्वती गोडे (वय58)असे जखमी महिलेचे नाव आहे. संपूर्ण घटना ही भिवंडी तालुक्यातील लोनाड देवरुंग पाड्यात घडली.
गावातील महिलेच्या मनात शिरला सैतान
घटनेच्या दिवशी वृद्ध महिला पार्वती या घरात एकट्या होत्या. याच संधीचा फायदा साधून प्रतिला नावाची महिला ही महिलेच्या घरातील दागिने चोरीच्या उद्देशाने घरात शिरली. त्यावर ती न थांबता वृद्ध महिलेला मारहाण करुन तिचा गला आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
advertisement
देवरुंग पाड्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात पडघा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षांकडेही तक्रार करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेने आरोपीविरुद्ध गंभीर दखलपात्र गुन्हा नोंदवून तिला अटक करण्याची मागणी केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
माणूसकीला काळिमा! पार्वतीबाई घरात एकट्या, गावातील महिलेच्या मनात शिरला सैतान; पुढे जे केलं भयकंर
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement