बीड हादरलं! सासरच्यांनी छळलं, तरुणाचं डोकं फिरलं, ‘त्या’ कृतीनं सगळंच संपलं
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Beed News: सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने टोकाचा निर्णय घेतला. भावाने जिल्हा पोलीस मुख्यालय गाठलं .
बीड: अलीकडच्या काळात नात्यातील ताणतणावांमुळे गुन्हेगारी आणि आत्महत्येसारख्या घटना वाढत आहेत. बीडमधील तेलगाव नाका परिसरात एका तरुणाने नुकतेच आत्महत्या केली. आदम महेमूद शेख असे मृताचे नाव आहे. सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी भाऊ आवेद शेख याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली.
नेमकं घडलं काय?
तेलगाव नाका परिसरातील आदम महेमूद शेख याचा 17 वर्षांपूर्वी सुहान आदम शेख यांच्याबरोबर विवाह झाला होता. त्यानंतर सासरच्या लोकांसोबत त्याचे मतभेद निर्माण झाले. त्यांनी आदम याचा छळ सुरू केला. त्याला मारहाण देखील होत होती. या सर्वाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली.
advertisement
दरम्यान, आदम शेख याच्या आत्महत्येस जबाबदार लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी आदमचा भाऊ आवेद शेख याने केली आहे. याबाबत त्याने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून लेखी मागणी केली. यावेळी त्यांचे अनेक नातेवाईक देखील उपस्थित होते.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 11:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बीड हादरलं! सासरच्यांनी छळलं, तरुणाचं डोकं फिरलं, ‘त्या’ कृतीनं सगळंच संपलं









