TRENDING:

Hair Care : नैसर्गिक उपायांनी करा केस काळे, आवळा, कडिपत्ता, लिंबाचा होईल उपयोग

Last Updated:

केस काळे करण्यासाठी कढीपत्ता, नारळाचं तेल, लिंबाचा रस, आवळा, कांद्याचा रस, काळा चहा या नैसर्गिक उत्पादनांचा उपयोग होतो. रासायनिक उत्पादनांमुळे केसांचं नुकसान होतं, ते टाळण्यासाठी या नैसर्गिक पर्यायांचा विचार करता येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पूर्वी उतारवयात केस पांढरे व्हायचे आता विविध कारणांमुळे केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण वाढलंय. पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादनं उपलब्ध आहेत, पण यामधली रसायनं केसांसाठी नुकसानकारक ठरु शकतात. केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरतात.
News18
News18
advertisement

केस काळे करण्यासाठी कढीपत्ता, नारळाचं तेल, लिंबाचा रस, आवळा, कांद्याचा रस, काळा चहा या नैसर्गिक उत्पादनांचा उपयोग होतो. रासायनिक उत्पादनांमुळे केसांचं नुकसान होतं, ते टाळण्यासाठी या नैसर्गिक पर्यायांचा विचार करता येईल.

कढीपत्ता -

कढीपत्त्यातल्या पौष्टिक गुणधर्मांमुळे केसांसाठी गुणकारी आहे. त्यात भरपूर प्रमाणात असलेल्या अँटीऑक्सिडंट्सचा वापर केसांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो. कढीपत्त्याची थोडी पानं नारळाच्या तेलात काळी होईपंर्यंत गरम करा. तेल गाळून घ्या आणि थंड झालं की नियमितपणे टाळूवर मालिश करा.

advertisement

Makarasana : मकरासन करा, शरीराचा आणि मनाचा थकवा घालवा, जाणून घ्या मकरासनाविषयीची माहिती

नारळाचं तेल आणि लिंबाचा रस

पौष्टिक आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे नारळाचं तेल हे केसांची काळजी घेण्यासाठी एक प्रभावी उत्पादन आहे. लिंबाच्या रसातली जीवनसत्त्वं आणि खनिजांमुळे निरोगी केसांच्या वाढीला प्रोत्साहन मिळतं आणि केस अकाली पांढरे होण्यापासून रोखता येतं. नारळाचं तेल आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा आणि हे मिश्रण टाळू आणि केसांना लावा. अर्धा तास हे मिश्रण तसंच राहू द्या आणि नंतर सौम्य शाम्पूनं धुवा.

advertisement

आवळा

पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा हा एक शक्तिशाली उपाय मानला जातो. व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटक असल्यानं केसांच्या रंगद्रव्यासाठी आवळा उपयुक्त आहे. आवळा नुसता किंवा आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पावडर आहारात वापरु शकता.

Probiotics : पचनव्यवस्थेसाठी प्रोबायोटिक्स का महत्त्वाचं ? दही किंवा ताकाचं सेवन कधी करावं ?

advertisement

काळा चहा

काळ्या चहातलं टॅनिन केस काळे आणि मजबूत करण्यास मदत करू शकतं. एक कप काळा चहा बनवा आणि थंड झाल्यावर केसांवर आणि टाळूवर लावा. एक तासानंतर पाण्यानं धुवा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय करा, केस हळूहळू काळे होतील.

कांद्याचा रस

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

कांद्याचा रस काढून टाळूला लावा, केसांच्या मुळांमधे हलक्या हातानं मालिश करा. तीस मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर सौम्य शाम्पूनं केस धुवा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : नैसर्गिक उपायांनी करा केस काळे, आवळा, कडिपत्ता, लिंबाचा होईल उपयोग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल