advertisement

Makarasana : मकरासन करा, शरीराचा आणि मनाचा थकवा घालवा, जाणून घ्या मकरासनाविषयीची माहिती

Last Updated:

योगामुळे शरीराबरोबरच मन आणि आत्म्याचंही संतुलन साधलं जातं. मकरासन हे अनेक योग आसनांपैकी एक. मकरासनामुळे शारीरिक थकव्यासोबतच मानसिक ताणतणावापासून देखील आराम मिळतो.

News18
News18
मुंबई : पाण्यात निवांत असलेली मगर कधी पाहिली असेल तर ती जशी निवांत पहुडलेली असते तसं एक आसन, शरीरासाठी आणि मानसिक शांततेसाठी खूप आवश्यक आहे. या आसनाचं नाव आहे मकरासन. पाहूयात मकरासन कसं करतात आणि त्याचे फायदे.
दिवसभराची धावपळ, कामाचा ताण, खाण्याच्या सवयी आणि मोबाईलचा वाढता वापर यामुळे आपली जीवनशैलीत मोठे बदल झालेत. लहान वयातच आजार होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जातो.
advertisement
प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तणावाचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना कधी अभ्यासाचं ओझं, कधी नोकरीची चिंता आणि वृद्धांना त्यांच्या शारीरिक - मानसिक समस्यांशी झुंजावं लागतं.
योगामुळे शरीराबरोबरच मन आणि आत्म्याचंही संतुलन साधलं जातं. मकरासन हे अनेक योग आसनांपैकी एक. मकरासनामुळे शारीरिक थकव्यासोबतच मानसिक ताणतणावापासून देखील आराम मिळतो.
advertisement
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं इन्स्टाग्रामवर मकरासनाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधे, मकरासनाचे फायदे, ते कसं करावं आणि काय खबरदारीचा घ्यावा याची माहिती देण्यात आली आहे.
मकरासन हा संस्कृत शब्द. ज्यात 'मकर' म्हणजे मगर आणि 'आसन' म्हणजे बसणं. हे आसन करताना शरीर मगरीसारखं शांत, स्थिर आणि आरामशीर असतं.
advertisement
आयुष मंत्रालयाच्या मते, या आसनामुळे शरीराला खोलवर आराम मिळतो आणि विशेषतः पाठीच्या समस्या दूर करण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. यामुळे थकवा दूर होतो, ताण कमी करण्यास मदत होते आणि शरीरात नवीन ऊर्जा भरते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Makarasana : मकरासन करा, शरीराचा आणि मनाचा थकवा घालवा, जाणून घ्या मकरासनाविषयीची माहिती
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement