Salt : सैंधव मीठाचे फायदे वाचा, पचन, तणाव व्यवस्थापनासाठी उपयुक्त
- Published by:Renuka Joshi
 
Last Updated:
सैंधव मीठ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सैंधव मीठ पांढरं आणि गुलाबी रंगाचं असतं आणि ते सर्वात शुद्ध मीठ मानलं जातं.
मुंबई: मीठ म्हणजे जेवणाचा अविभाज्य भाग..कोणत्याही अन्नाची लज्जत मीठानं वाढते. सैंधव मीठ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सैंधव मीठ पांढरं आणि गुलाबी रंगाचं असतं आणि ते सर्वात शुद्ध मीठ मानलं जातं.
उपवासाच्या वेळी हे सर्वात जास्त वापरलं जातं. सैंधव मीठ गुलाबी मीठ, हिमालयीन मीठ, सैंधव मीठ, लाहोरी मीठ किंवा हॅलाइड सोडियम क्लोराईड म्हणून ओळखलं जातं. आयुर्वेदानुसार, सैंधव मीठामुळे अनेक गंभीर आजार दूर होऊ शकतात. गॅस, मधुमेह तसंच पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर सैंधव मीठ उपयुक्त आहे.
advertisement
सैंधव मीठामधे खनिजं, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोषक घटक आढळतात, आरोग्यासाठी हे घटक खूप फायदेशीर मानले जातात.
ताण - ताण व्यवस्थापनातही मीठ उपयुक्त आहे, कारण सैंधव मीठाच्या नियमित वापरामुळे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्स संतुलित राहतात, ज्यामुळे ताणाचा आपल्यावर जास्त प्रभाव पडत नाही, त्यामुळे तणावाची समस्या कमी होते..
advertisement
त्वचा-
रॉक सॉल्टमधे त्वचेसाठी उपयुक्त क्लींजिंग आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकणं, रंग उजळण्यासाठी आणि त्वचा मऊ करण्यासाठी हे घटक मदत करू शकतात.
लठ्ठपणा-
लठ्ठपणा ही आता घराघरातली समस्या झाली आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी सैंधव मीठ उपयुक्त मानलं जातं. या मीठात चरबी कमी करणारे घटक आढळतात. भूक नियंत्रित करण्यासाठी देखील यामुळे मदत होते. वजन कमी करायचं असेल तर हे मीठ खाणं उपयुक्त आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 2:40 PM IST


