सेवा पंधरवड्यात करून घ्या हे तीन कामे, तालुक्याला होणारे काम गावातच होणार
संभाजीनगर शहरातील गुलमंडी या ठिकाणी तुम्हाला दांडिया आणि गरबासाठी लागणारे सुंदर असेच आणि या चनिया चोली हे उपलब्ध आहेत. या ठिकाणी तुम्हाला महिलांसाठी त्यासोबतच पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी देखील आकर्षक असे कपडे उपलब्ध आहेत. शहरातील गुलमंडी या ठिकाणी असलेल्या चामुंडा कलेक्शन या ठिकाणी हे सर्व उपलब्ध आहे. या ठिकाणी लहान मुलींसाठी चनिया चोली यामध्ये मिरर वर्क त्यासोबतच डिजिटल वर्क मध्ये देखील उपलब्ध आहेत. मुलांसाठी देखील जॅकेट धोती पगडी असं सगळं उपलब्ध आहे. अगदी तीनशे रुपयांपासून हे लहान मुलांचे कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत.
advertisement
नवरात्री गरबा-दांडियामध्ये करा सोप्या- खास स्टेप्स; कोरिओग्राफरकडून शिका स्टेप्स
महिला साठी या ठिकाणी सुंदर असे चनिया चोली उपलब्ध आहेत. यामध्ये डिजिटल प्रिंट मिरर वर्क त्यासोबतच राजवाडी अशा वेगवेगळ्या प्रकारचे घागरे या ठिकाणी उपलब्ध आहेत. चौदाशे रुपये पासून याची सुरुवात होते. त्यासोबतच मुलींना लागणारे ज्वेलरी देखील या ठिकाणी उपलब्ध आहे यामध्ये चोकर, हेअर ॲक्सेसरीज, कडे,कंबरपट्टा, नोज पिन अशा सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत ते सुद्धा साठ रुपये पासून. आणि जर तुम्हाला हे सर्व रेंटवर घ्यायचा असेल ते देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. मुलींना रेंटवर देखील चनिया चुली उपलब्ध आहेत यासोबत तुम्हाला ज्वेलरी देखील भेटून जाते.
नवरात्रनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल...
त्यासोबतच मुलांकरता देखील या ठिकाणी तुम्हाला छान छान प्रकारच्या पगडी जॅकेट धोती पॅन्ट देखील उपलब्ध आहेत. यावर्षी पगडीमध्ये भरपूर अशा व्हरायटी आहेत. पगडी वरती दुर्गा माता चा फोटो मोर अशा पगड्या आहेत आणि यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहेत. या तुम्ही रेंटवर देखील घेऊ शकता किंवा खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला या ठिकाणी कपल ड्रेसेस देखील उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारचे सर्व कपडे विक्रीसाठी आलेले आहेत. आणि हे तुम्ही सर्व गुलमंडी या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकता.