नवरात्री गरबा-दांडियामध्ये करा सोप्या आणि खास स्टेप्स; कोरिओग्राफर गौरी नार्वेकर यांच्याकडून शिका हटक्या स्टेप्स
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होत असताना, कळव्यातील डान्स कोरिओग्राफर गौरी नार्वेकर यांनी खास गरबा वर्कशॉप आयोजित करून तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्या "गौरी डान्स कट्टा" या नावाने डान्स क्लासेस चालवत असून, बॉलिवूड, हिपहॉप, कंटेम्पररीसारख्या विविध नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण देतात.
नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होत असताना, कळव्यातील डान्स कोरिओग्राफर गौरी नार्वेकर यांनी खास गरबा वर्कशॉप आयोजित करून तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्या \"गौरी डान्स कट्टा\" या नावाने डान्स क्लासेस चालवत असून, बॉलिवूड, हिपहॉप, कंटेम्पररीसारख्या विविध नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण देतात. यंदाच्या नवरात्रीनिमित्त १५ ते १९ सप्टेंबर दरम्यान त्यांनी ५ दिवसांचा गरबा वर्कशॉप घेतला होता. या वर्कशॉपसाठी ३ बॅचेस आयोजित करण्यात आल्या होत्या आणि सहभागींचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर लाभला.
advertisement
गौरीताईंनी गरबा आणि रास यामधील फरक समजावून सांगताना म्हटलं, "गरबा हा सर्कलमध्ये खेळला जाणारा डान्स असून, त्यात फक्त हातांचा वापर होतो आणि कोणत्याही प्रॉप्सची गरज लागत नाही. त्यामुळे हा डान्स स्वतंत्रपणे करता येतो. दुसरीकडे, राससाठी दांडिया आणि पार्टनर आवश्यक असतो, त्यामुळे त्यात समन्वय अधिक महत्त्वाचा ठरतो."
advertisement
वर्कशॉपमध्ये त्यांनी गरब्याच्या काही सोप्या स्टेप्स शिकवल्या ज्या नवशिक्यांसाठी उपयुक्त ठरल्या. या स्टेप्समध्ये:
advertisement
या वर्कशॉपमुळे सहभागी विद्यार्थ्यांना गरब्याची मूलतत्त्वे आणि तालबद्धता आत्मसात करता आली. गौरी नार्वेकर यांचा हा उपक्रम कळव्यातील सांस्कृतिक आणि नृत्य प्रेमींसाठी नक्कीच एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 20, 2025 5:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवरात्री गरबा-दांडियामध्ये करा सोप्या आणि खास स्टेप्स; कोरिओग्राफर गौरी नार्वेकर यांच्याकडून शिका हटक्या स्टेप्स