सेवा पंधरवड्यात करून घ्या हे तीन कामे, तालुक्याला होणारे काम गावातच होणार

Last Updated:

नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची बचत व्हावी आणि जलद कामे व्हावीत म्हणून राज्य सरकार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवडा राबवत आहे. या पंधरा दिवसांच्या कालावधीत गावातील नागरिकांची महसूल विभागाशी निगडित असलेली विविध कामे गावातच करण्यात येणार आहेत.

+
जालना

जालना

नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची बचत व्हावी आणि जलद कामे व्हावीत म्हणून राज्य सरकार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवडा राबवत आहे. या पंधरा दिवसांच्या कालावधीत गावातील नागरिकांची महसूल विभागाशी निगडित असलेली विविध कामे गावातच करण्यात येणार आहेत. पाहूयात या पंधरा दिवसांच्या कालावधीत कोणकोणती कामे तुम्ही गावातच करून घेऊ शकता. त्याबाबत लोकल एटीन ने जालना च्या तहसीलदार छाया पवार यांच्याकडून जाणून घेतलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने या सेवा पंधरवड्यात प्रामुख्याने दोन बाबी शी संबंधित अडचणी सोडवण्यास सांगितला आहे. पहिलं म्हणजे पानंद रस्त्यांच्या बाबतीत असलेल्या समस्यांचे निराकरण करणे.
advertisement
यामध्ये गाव नकाशावर असलेल्या रस्त्यांची नोंद घेणे, गाव नकाशावर नसलेली परंतु वापरात असलेली रस्त्याची नोंद घेणे, पानंद रस्त्यावर असलेलं अतिक्रमण काढणे याबाबत मोहीम राबवण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
तर दुसरा विषय हा सर्वांसाठी घर हा आहे. यामध्ये 2011 पूर्वी मिळालेलं आणि गायरान जमिनीवर बांधण्यात आलेलं घरकुल नियमाकुल करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहे. आणि तिसरा विषय हा स्थानिक पातळीवर ठरवण्यचे निर्देश देण्यात आले आहे.
advertisement
जालन्याचा जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी न्याय आपल्या दारी ही संकल्पना राबवण्यास सांगितले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील फेरफार संबंधित प्रकरणे, महसूल अंतर्गत असणारी न्यायालयीन प्रकरणी, रस्त्याची प्रकरणे जिल्हाधिकारी किंवा महसूल मंत्र्यांकडे तक्रार झालेली प्रकरणे अशी प्रकरणे सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती तहसीलदार छाया पवार यांनी लोकल एटीनशी बोलताना दिली.
advertisement
दरम्यान सेवा पंधरवड्या अंतर्गत जालन्यातील सावरगाव येथील संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. त्याचबरोबर एका रस्त्याचं अतिक्रमण काढून तो रस्ता मुक्त करण्यात आला. आणि काही नागरिकांना नवीन रेशन कार्डच वाटप देखील करण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सेवा पंधरवड्यात करून घ्या हे तीन कामे, तालुक्याला होणारे काम गावातच होणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement