विशेष म्हणजे काही कलेक्शन 1 ग्राम सोन्यामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये गोल्ड प्लेटेड ज्वेलरी सेट्स, झुमके आहेत. येथील ब्रास बांगड्यांची रेंज 350 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत आहे. यांच्याकडे ट्रेंड आणि पारंपरिक दोन्ही प्रकारच्या दागिन्यांचा समावेश आहे जे नवरात्रीच्या उत्सवासाठी योग्य ठरतात. तसेच बुगडी सुद्धा या शॉपमध्ये उपलब्ध आहे जी ट्रेंडी आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारात मिळते आणि त्याची किंमत 100 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये साउथ पॅटर्नमध्ये मंगळसूत्रही मिळते जे 550 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. प्योर ब्रास बांगड्यांची रेंज 250 रुपयांपासून 750 रुपयांपर्यंत आहे, जी आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासाठी योग्य आहे. 1 ग्राम कलेक्शनही 1000 रुपयांपासून सुरू होते. याचबरोबर मराठमोळा साज तसेच टर्किश, कॅथलिक आणि साउथ इंडियन डिझाइन्समध्ये देखील दागिने उपलब्ध आहेत.
ऑक्सिडाईड ज्वेलरी ज्यामध्ये इयरिंग्स आणि नॅकलेस यांचा समावेश आहे ते देखील 100 रुपयांपासून सुरू होतात. या शॉपमध्ये देवीच्या सजावटीसाठी सर्व प्रकारच्या दागिन्यांचा विविध कलेक्शन उपलब्ध आहे जे उत्सवाच्या रंगात भर घालेल.
यांच दुकान वसई गाव, पारनाका शनि मंदिर येथे स्थित आहे. याठिकाणी जाऊन नवरात्रीसाठी आकर्षक खरेदी करायला विसरू नका.