अलीकडे मंकी ब्रांचिंग हा डेटिंग ट्रेंड खूप चर्चेत आला आहे. यामध्ये माणूस आपल्या पूर्वजांप्रमाणे, म्हणजे माकडांसारखे वागतो असे मानले जाते. ज्या प्रकारे माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारते, त्याचप्रमाणे आता माणूसही आपल्या डेटिंग लाइफमध्ये एका नात्यातून दुसऱ्या नात्यात उड्या मारत राहतो. अजूनही समजले नाही? तर चला, उदाहरणासह समजून घेऊया.
advertisement
डेटिंगमध्ये मंकी ब्रांचिंग म्हणजे काय?
एका नात्यातून पूर्णपणे बाहेर न पडता दुसऱ्या नात्याचा शोध घेणे म्हणजे मंकी ब्रांचिंग. याला मंकी बेअरिंग असेही म्हटले जाते. या ट्रेंडमध्ये लोकांना दुसरा पर्याय मिळेपर्यंत ते ब्रेकअप करत नाहीत. एकतर हा ट्रेंड फॉलो करणारे लोक खूपच जास्त इमोशनल आहेत किंवा मग त्यांना फसवणुकीच्या वेदना जाणवतच नाहीत.
लोक मंकी ब्रांचिंग का करतात?
हा ट्रेंड प्रेम मजबूत करण्याऐवजी माणसामध्ये द्वेष आणि फसवणुकीचे बीज पेरतो. हा ट्रेंड विशेषतः त्या लोकांसाठी सोयीचा आहे, ज्यांना एकटेपणाची भीती वाटते. इमोशनल डिपेंडन्सी असलेले लोक अनेकदा आपल्या नात्यात हा पॅटर्न फॉलो करतात.
नुकसान काय आहे?
हा ट्रेंड सक्रियपणे फॉलो करणारे लोक वरवर पाहता आनंदी वाटू शकतात, कारण ते पटकन पुढे गेले आहेत असे दिसते. पण प्रत्यक्षात ते भावनिकदृष्ट्या थकलेले असतात. अशा लोकांसोबत नात्यात आनंदी राहणे सोपे नसते. कारण ते ना स्वतःला नीट समजून घेतात, ना नात्यातील त्रुटी स्वीकारून त्या सुधारण्याचा प्रयत्न करतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
