TRENDING:

स्क्रीन नव्हे, तर 'या' व्हिटॅमिनच्या कमतरेतमुळे डोळ्यांवर होतो गंभीर परिणाम! वेळीच सावध व्हा, अन्यथा...

Last Updated:

डिजिटल युगात स्क्रीनसमोर वाढलेल्या वेळेमुळे डोळ्यांचे त्रास वाढले आहेत. मात्र, यासोबतच चुकीचा आहार आणि पोषणतत्त्वांची कमतरताही डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरते. व्हिटॅमिन A ची कमतरता...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डिजिटायझेशनच्या युगात स्मार्टफोन आणि लॅपटॉप प्रत्येक व्यक्तीच्या हातात दिसतात. बहुतेक कामं ऑनलाइन होत आहेत आणि यामुळे डोळ्यांच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. अनेकदा लोक डोळ्यांच्या समस्यांचा संबंध स्क्रीनशी जोडतात. मात्र, काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. डोळे तीक्ष्ण आणि निरोगी ठेवण्यासाठी पोषण खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या आहारात काही पोषक तत्वांची कमतरता असल्यास डोळ्यांच्या समस्या होऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.
Vitamin A for eyes
Vitamin A for eyes
advertisement

समस्या गंभीर असेल, तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते

अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑप्थल्मोलॉजी (AAO) च्या रिपोर्टनुसार, डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए सर्वात महत्त्वाचं आहे. शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता असल्यास रातांधळेपणा येऊ शकतो. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या कॉर्नियाच्या कार्यालाही मदत करतं. ज्या लोकांना व्हिटॅमिन ए ची कमतरता असते, त्यांच्या डोळ्यात पुरेसं वंगण (lubricant) तयार होत नाही, ज्यामुळे त्यांना डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या येते. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेचा दृष्टीवरही वाईट परिणाम होतो. अनेक गंभीर प्रकरणांमध्ये व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे दृष्टी जाऊ शकते. मात्र, डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि बी व्हिटॅमिन्सही आवश्यक आहेत. ही व्हिटॅमिन्स डोळ्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यांच्या कमतरतेमुळेही डोळ्यांच्या समस्या होऊ शकतात.

advertisement

शरीराला व्हिटॅमिन ए कुठून मिळतं?

आपल्या शरीराला व्हिटॅमिन ए अन्न आणि पेयांमधून मिळतं. बीटा-कॅरोटीन आपल्या आहारात व्हिटॅमिन ए चा मुख्य स्रोत आहे. हा वनस्पतींमध्ये आढळणारा एक प्रकारचा रंगद्रव्य आहे, ज्याला कॅरोटीनॉइड म्हणतात. हा अनेक रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांमध्ये आढळतो. जेव्हा एखादी व्यक्ती कॅरोटीनॉइड्सचं सेवन करते, तेव्हा शरीर या रंगद्रव्यांना व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करतं. अशा प्रकारे, आपल्याला अन्न आणि पेयांमधून व्हिटॅमिन ए मिळतं. रताळे, गाजर, लाल सिमला मिरची, भोपळा आणि दोडका यांसारख्या गोष्टी खाल्ल्याने व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात मिळू शकतं.

advertisement

इतरही व्हिटॅमिन्स डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचे

केवळ व्हिटॅमिन ए च नाही, तर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि झिंकही डोळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. ते अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात आणि फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून डोळ्यांचं संरक्षण करतात. ते मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजेनरेशनसारख्या वयानुसार होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांना रोखण्यासही मदत करतात. आहाराव्यतिरिक्त, स्क्रीन टाईम कमी केल्यानेही डोळ्यांचं आरोग्य सुधारता येतं. चांगली जीवनशैली आणि पुरेशी झोप घेतल्याने डोळे निरोगी ठेवता येतात.

advertisement

हे ही वाचा : राजमा की छोले? कशात आहे जास्त प्रोटीन? वेट लॉस करायचं असेल, तर 'हा' पर्याय आहे बेस्ट!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणारी बीट कोशिंबीर, कमी वेळेत बनवा पौष्टिक रेसिपी, सोप्या पद्धतीचा Video
सर्व पहा

हे ही वाचा : Kidney Failure : मूत्रपिंडं निकामी होण्यापासून रोखा, आजपासूनच काळजी घ्या

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
स्क्रीन नव्हे, तर 'या' व्हिटॅमिनच्या कमतरेतमुळे डोळ्यांवर होतो गंभीर परिणाम! वेळीच सावध व्हा, अन्यथा...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल