TRENDING:

केवळ चॅटिंग करणं म्हणजे फसवणूक आहे का? तुमच्या संसारात 'डिजिटल' काय गोंधळ घालू शकतो, एकदा हे वाचाच

Last Updated:

अनेकांना प्रश्न पडतो की, "मी फक्त मेसेज तर करतोय, त्यात फसवणूक कसली?" पण मानसशास्त्रज्ञांच्या मते, ही 'मायक्रो चीटिंग' तुमच्या नात्याचा पाया कमकुवत करू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या डिजिटल युगात नातेसंबंधांची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी 'फसवणूक' किंवा 'अफेअर' म्हटलं की केवळ शारीरिक संबंधांचा विचार केला जायचा. पण आता तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमुळे नात्यांमध्ये 'डिजिटल तिसरा' शिरला आहे. कधी रात्री उशिरापर्यंत कोणाशी तरी चॅटिंग करणं, कधी सोशल मीडियावर फोटो लाइक करणं, तर कधी जुन्या प्रियकराशी पुन्हा संवाद साधणं... हे सगळं निर्दोष वाटत असलं तरी तुमच्या सुखी संसाराला लागलेली ती एक 'डिजिटल वाळवी' असू शकते.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

अनेकांना प्रश्न पडतो की, "मी फक्त मेसेज तर करतोय, त्यात फसवणूक कसली?" पण मानसशास्त्रज्ञांच्या मते, ही 'मायक्रो चीटिंग' तुमच्या नात्याचा पाया कमकुवत करू शकते.

केवळ चॅटिंग करणं म्हणजे फसवणूक आहे का? तुमच्या संसारात 'डिजिटल तिसरा' काय गोंधळ घालू शकतो पाहा

दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आपण सोशल मीडिया स्क्रोल करतो. याच प्रवासात कधीतरी जुना मित्र भेटतो किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संवाद सुरू होतो. सुरुवातीला हे सगळं गमतीशीर वाटतं. पण जेव्हा हा संवाद तुमच्या जोडीदारापासून लपवला जातो, तेव्हा तिथे 'इमोशनल इन्फिडेलिटी' सुरू होते.

advertisement

चॅटिंग म्हणजे फसवणूक कधी ठरते?

केवळ बोलणं चुकीचं नाही, पण जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला ज्या गोष्टी सांगत नाही, त्या तिसऱ्या व्यक्तीला सांगू लागता, तेव्हा ती फसवणूक ठरते. गुपितं सामायिक करणे: जर तुम्ही तुमच्या मनातील भीती, स्वप्न किंवा ऑफिसमधील तणाव जोडीदाराऐवजी चॅटिंगवरील व्यक्तीला सांगत असाल, तर तुमचं भावनिक नातं त्या व्यक्तीशी जोडलं जातं. जर जोडीदार जवळ आल्यावर तुम्ही फोनची स्क्रीन लपवत असाल किंवा पासवर्ड बदलत असाल, तर तुमच्या मनात 'चोर' आहे हे स्पष्ट होतं.

advertisement

संसारात 'डिजिटल तिसऱ्या'चा प्रवेश कसा होतो?

संसारात जेव्हा संवाद कमी होतो किंवा जोडीदाराकडून दुर्लक्ष होतं, तेव्हा माणूस बाहेर आधार शोधू लागतो. स्मार्टफोनमुळे हा आधार शोधणं सोपं झालं आहे. कोणाच्या तरी फोटोंवर सतत 'हार्ट' इमोजजी टाकणे किंवा रिल्स शेअर करणे ही 'मायक्रो चीटिंग'ची पहिली पायरी असू शकते.

रात्रीच्या शांततेत जेव्हा जोडीदार शेजारी झोपलेला असतो आणि तुम्ही दुसऱ्याशी चॅटिंगमध्ये मग्न असता, तेव्हा तुमच्या नात्यात 'डिजिटल तिसरा' अधिकृतपणे शिरलेला असतो.

advertisement

याचे परिणाम काय होतात?

डिजिटल फसवणूक ही शारीरिक फसवणुकीपेक्षा अधिक घातक ठरू शकते. चॅटिंगवरील व्यक्ती नेहमीच 'परफेक्ट' वाटते, कारण ती फक्त मेसेजवर असते. यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराची तुलना त्या व्यक्तीशी करू लागता आणि जोडीदारातील उणिवा अधिक दिसू लागतात. एकदा का जोडीदाराला तुमच्या चॅटिंगबद्दल समजलं, तर पुन्हा विश्वास निर्माण करणं कठीण होतं. "तू फक्त चॅटिंगच करत होतास की आणखी काही?" हा संशय नातं संपवू शकतो.

advertisement

तुमचे नाते कसे वाचवाल?

तुमच्या फोनचा पासवर्ड जोडीदाराला माहिती असला पाहिजे, असे नाही; पण तो लपवून ठेवण्याची गरजही भासू नये. घरी आल्यावर ठराविक वेळ फोन बाजूला ठेवा आणि जोडीदाराशी संवाद साधा. विरुद्ध लिंगी व्यक्तीशी बोलताना तुमची मर्यादा (Boundary) काय आहे, हे स्वतःला वारंवार बजावा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

डिजिटल जग आभासी असलं तरी त्याचे परिणाम तुमच्या खऱ्या आयुष्यातील नात्यावर मात्र कायमस्वरूपी होतात. चॅटिंग ही केवळ एक 'वेळ घालवण्याची गोष्ट' न राहता तुमच्या संसारातील शांतता हिरावून घेणारं शस्त्र ठरू शकतं. त्यामुळे 'डिजिटल तिसऱ्या'ला आपल्या बेडरुमच्या बाहेरच ठेवलेलं बरं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
केवळ चॅटिंग करणं म्हणजे फसवणूक आहे का? तुमच्या संसारात 'डिजिटल' काय गोंधळ घालू शकतो, एकदा हे वाचाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल