दैनंदिन खाणं - पिणं व्यवस्थित असेल तर शरीर सहसा इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेऊ शकतं. पण खूप घाम येत असेल किंवा उलट्या होत असतील किंवा वारंवार जुलाब होत असतील तर सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी आवश्यक खनिजं शरीरातून वेगानं बाहेर पडतात आणि डिहायड्रेशन होऊ लागतं. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रोलाइट किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्स फायदेशीर आहेत, पण जास्त प्रमाणात नाही.
advertisement
Skin Care : रोज मेकअप करता ? या स्किन केअर टिप्सचा होईल उपयोग
शरीरातील द्रव पातळी संतुलित करण्याचं प्रमाण इलेक्ट्रोलाइट्स करत असतात आणि स्नायू, नसा आणि अवयवांचं काम यामुळे योग्यरित्या होतं. पण ही खनिजं जास्त प्रमाणात घेतली तर त्याचे उलट परिणाम होतात आणि यामुळे असंतुलन निर्माण होऊ शकतं.
यामुळे अशक्तपणा, डोकेदुखी, थरथरणं, गोंधळल्यासारखं वाटणं, स्नायूंवर ताण येणं, हृदयाचे ठोके जलद होणं, मळमळ आणि पोट खराब होणं अशी लक्षणं जाणवतात. शरीरात इलेक्ट्रोलाइट्समध्ये जास्त वाढ झाल्यामुळे हायपरनेट्रेमिया किंवा हायपरक्लेमिया सारख्या परिस्थिती उद्भवू शकतात, ज्यामुळे नसा आणि हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो.
या अवस्थेत शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम होऊ शकतात. हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात, रक्तदाब वाढू शकतो आणि मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडण्याचा धोका वाढतो.
इलेक्ट्रोलाइट पावडरचे अनेक ब्रँड निर्धारित प्रमाणात पाण्यात एक पॅकेट विरघळवून ते पिण्याची शिफारस करतात. काही लोक हे दररोज वापरतात. पण हे वारंवार वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे.
Heel Pain: टाचा का दुखतात ? कारणं समजून घ्या, उपचार करणं होईल सोपं
जास्त घाम येणं, व्यायाम करणं किंवा पोटाच्या संसर्गामुळे, वारंवार इलेक्ट्रोलाइट्स पिण्यामुळे याचा ओव्हरडोस होईल. अशावेळी, पाणी पिणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.
व्यायाम सुरू करण्यापूर्वी 45 ते 60 मिनिटं आधी 8 ते 16 औंस पाणी पिण्याची शिफारस तज्ज्ञ करतात. पण हे प्रत्येकाच्या व्यायामाच्या स्वरुपानुसार, तब्येतीवर अवलंबून असतं. त्यामुळे व्यायाम करत असाल तर इलेक्ट्रोलाइट्सबद्दल डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
इलेक्ट्रोलाइट्स शरीराला आवश्यक आहेत, पण शरीराला आवश्यक हे त्याच प्रमाणात. जास्त प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स हानिकारक असू शकतं हे लक्षात ठेवा.
