नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी त्यांना वडापाव खूप आवडत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पुण्यातील प्रसिद्ध प्रभात हॉटेलचा वडापाव त्यांना खूप आवडतो. त्यांनी या वडापावची कौतुक करत सांगितले की, ते एकावेळी ३ वडापावही खाऊ शकतात. ते हेदेखील म्हणाले की, त्यांनी त्यांनी तिथून रेसिपी घेतली आणि ती घरीही बनवली. चला पाहूया कसे बनतात नितीन गडकरींचे आवडते हे वडापाव.
advertisement
वडापाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य...
बटाटे
लिंबू
काळं मीठ
आल्याची पेस्ट
लसणाची पेस्ट
कांद्याची पेस्ट/बारीक चिरलेला कांदा
मिरचीचे तुकडे
थोडीशी साखर
वडापाव बनवण्याची कृती...
हा वडापाव बनवण्यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे घ्या. त्यानंतर त्यात लिंबू पिला. नंतर यामध्ये आल्याची पेस्ट, कांद्याची पेस्ट, लसणाची पेस्ट काळं मीठ आणि मिरचीचे तुकडे टाकून एकजीव करा. यामध्ये तुम्ही थोडी साखरही घालू शकता. त्यानंतर याचे गोल वडे बनवून ते बेसनाच्या बॅटरमध्ये घोळून घ्या आणि चांगले तळून घ्या. बिना हळद-तिखटाचे हे वडे खायला अतिशय चविष्ठ लागतात. नितीन गडकरी यांनी या रेसिपीमध्ये लिंबू आणि साखर आवर्जून घालण्यास सांगितले.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
