मूळचे लिंगायत कोष्टी असलेल्या संभुआप्पांचे गुरू मालगावचे बुवाफन होते. श्री संभुआप्पा हे लिंगायत कोष्टी समाजातील सत्पुरुष तर बुवाफन हे संभुआप्पांचे गुरू मुस्लिम समाजातील. दोघेही मूळ मिरजेच्या मालगावचे होते. खरं तर संत-महात्म्यांना जात-धर्म नसतो. असतो तो एकच 'मानवता धर्म' याच धर्माचे पालन उरूस इस्लामपूरचे नागरिक गेली 350 वर्षे गुण्यागोविंदाने करीत आहेत.
advertisement
कोल्हापूरच्या पठ्ठ्याचं MPSC परीक्षेत घवघवीत यश, आईच्या कष्टांचं चीज
कार्तिक पौर्णिमा हा श्री संभुआप्पांचा जन्मदिवस मानला जातो. पौष मास वद्य नवमी शके 1663 रोजी संभुआप्पांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी इरुबाईं आणि पुत्र श्री बाबुआप्पा-पहिले मठाधिपती यांनी मठाचा कार्यभार पाहण्यास सुरुवात केली. त्यांच्या काळापासूनच उरुस भरविण्याची प्रथा सुरू झाली असल्याचे सध्याचे मठाधिपती मिलिंद मठकरी यांनी सांगितले.
कार्तिक शुद्ध दशमीस पाच चांदण्या असणारा नक्षीदार कापडी मंडप उभारून व गूळ किंवा साखर वाटून उरुसास सुरुवात करण्याची प्रथा आजही जोपासली जाते. यावेळी सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येतात. सर्वजण सन्मानपूर्वक आपली परंपरागत सेवा बजावतात आणि एकदिलाने मंडप चढवून आनंदोत्सव साजरा करतात.
हिंदू-मुस्लिम ऐक्यासह सर्वधर्मसमभाव जपणारी ही यात्रा इस्लामपूर शहराचे सांस्कृतिक वैभव मानली जाते. हिंदू-मुस्लिम बांधवांसह बारा बलुतेदार मिळून उरुसाचे सर्व धार्मिक विधी पार पाडतात. इस्लामपुरातील विस्तीर्ण जागेमध्ये खेळणी आणि खाद्यपदार्थांचे 500 हून अधिक स्टॉल्स लागतात. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक मोठ्या उत्साहाने उरूसाचा उत्सव साजरा करतात. या यात्रेच्या माध्यमातून इस्लामपूर पालिकेस कर स्वरूपात जवळपास सहा लाखांचे उत्पन्नही मिळते. विविध धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमांसह बैल बाजार आणि रांगोळ्यांच्या स्पर्धा तसेच प्रदर्शनेदेखील थाटली जातात.





