दहीतडका बनवण्यासाठी साहित्य
दही – 1 वाटी
पाणी – अर्धा कप
हळद – ¼ चमचा
लाल तिखट – ½ चमचा
मीठ – चवीनुसार
तेल – 1 मोठा चमचा
मोहरी – ½ चमचा
जिरे – ½ चमचा
हिंग – चिमूटभर
कढीपत्ता – 7-8 पाने
हिरवी मिरची – 1 (चिरलेली)
कोथिंबीर – सजावटीसाठी
advertisement
कांदा- 1 बारीक चिरलेला
कार्तिकी एकादशीला बनवा मोकळी, मऊ साबुदाणा खिचडी; चिकट होणार नाही! Recipe
दहीतडका कृती:
एका भांड्यात दही घेऊन त्यात पाणी टाकून नीट एकत्र फेटून घ्या. जेणेकरून त्यातील दह्याच्या गाठी सुटतील आणि दही मऊसूध होईल. कढईत तेल गरम करून त्यात कांदा, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून परतून घ्या. मग गॅस बंद करून या फोडणीत तयार केलेलं दह्याचं मिश्रण सावकाश ओता. वरून कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करा.
टीप: गरम भातावर एक चमचा दहीतडका ओता. वरून थोडी कोथिंबीर आणि लिंबाचा रस चव दुप्पट वाढवेल. थकलेल्या दिवसाच्या शेवटी कमी मेहनतीत पण जबरदस्त चवीचा दहीतडका करून पाहा. पारंपरिक चवीला आधुनिक टच देणारा हा पदार्थ तुमचं रोजचं जेवण नक्की खास बनवेल.





