Dahitadka Recipe : दररोजच्या जेवणात तिच भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा दहीतडका, रेसिपीचा Video

Last Updated:

दह्याची मऊसर चव, मसाल्यांचा तडका आणि सुगंधी फोडणीचा स्पर्श या सगळ्याचं एक अप्रतिम मिश्रण म्हणजे हा पारंपरिक पण ट्रेंडी पदार्थ, जो भातासोबत आणि चपातीसोबतही खाऊ शकतो.

+
आमटी-भाजीचा

आमटी-भाजीचा कंटाळा? मग करा ‘दहितडका’ची धमाल रेसिपी — झटपट, स्वादिष्ट आणि हटके!

मुंबई : दररोजच्या जेवणात तीच तीच आमटी आणि भाजी करून कंटाळा आलाय? स्वयंपाकघरात तासन्‌तास उभं राहायची इच्छा नाही, पण काहीतरी झटपट आणि चविष्ट खायचंय? मग आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. थोड्या वेळात अगदी कमी साहित्य वापरून तयार होणारा आणि चवीने सगळ्यांना भुरळ घालणारा पदार्थ म्हणजे दहीतडका. दह्याची मऊसर चव, मसाल्यांचा तडका आणि सुगंधी फोडणीचा स्पर्श या सगळ्याचं एक अप्रतिम मिश्रण म्हणजे हा पारंपरिक पण ट्रेंडी पदार्थ, जो भातासोबत आणि चपातीसोबतही खाऊ शकतो.
दहीतडका बनवण्यासाठी साहित्य
दही – 1 वाटी
पाणी – अर्धा कप
हळद – ¼ चमचा
लाल तिखट – ½ चमचा
मीठ – चवीनुसार
तेल – 1 मोठा चमचा
मोहरी – ½ चमचा
जिरे – ½ चमचा
हिंग – चिमूटभर
कढीपत्ता – 7-8 पाने
हिरवी मिरची – 1 (चिरलेली)
कोथिंबीर – सजावटीसाठी
advertisement
कांदा- 1 बारीक चिरलेला
दहीतडका कृती:
एका भांड्यात दही घेऊन त्यात पाणी टाकून नीट एकत्र फेटून घ्या. जेणेकरून त्यातील दह्याच्या गाठी सुटतील आणि दही मऊसूध होईल. कढईत तेल गरम करून त्यात कांदा, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून परतून घ्या. मग गॅस बंद करून या फोडणीत तयार केलेलं दह्याचं मिश्रण सावकाश ओता. वरून कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करा.
advertisement
टीप: गरम भातावर एक चमचा दहीतडका ओता. वरून थोडी कोथिंबीर आणि लिंबाचा रस चव दुप्पट वाढवेल. थकलेल्या दिवसाच्या शेवटी कमी मेहनतीत पण जबरदस्त चवीचा दहीतडका करून पाहा. पारंपरिक चवीला आधुनिक टच देणारा हा पदार्थ तुमचं रोजचं जेवण नक्की खास बनवेल.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
Dahitadka Recipe : दररोजच्या जेवणात तिच भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा दहीतडका, रेसिपीचा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement