नोव्हेंबरचा पहिलाच आठवडा या राशींसाठी असणार सर्वात खास! या चुका करू नका, अन्यथा होईल गंभीर परिणाम

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे आणि या महिन्याचा पहिला आठवडा अत्यंत शुभ मानला जात आहे.
1/5
astrology news
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे आणि या महिन्याचा पहिला आठवडा अत्यंत शुभ मानला जात आहे. या काळात अनेक ग्रहयोग आणि राजयोग निर्माण होत असून, तुळशी विवाह, देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेसारखे धार्मिक उत्सवही याच आठवड्यात साजरे होणार आहेत. त्यामुळे हा काळ आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा देणारा असेल. पाहूया या आठवड्यात धनु आणि मकर राशींचं साप्ताहिक राशीभविष्य कसं राहणार आहे.
advertisement
2/5
धनु राशी
धनु राशी -  धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रेमाच्या दृष्टीने रोमांचक ठरणार आहे. नात्यातील जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि एकमेकांविषयी विश्वास वाढेल. जे अविवाहित आहेत त्यांना एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
astrology news
नात्यात आनंद आणि स्थिरता येईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. विनाकारण खर्च टाळा आणि बचत वाढवा. आठवड्याच्या मध्यावर काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, मात्र आठवड्याच्या अखेरीस आर्थिक स्थैर्य परत मिळेल. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.
advertisement
4/5
astrology
मकर राशी - मकर राशीच्या लोकांसाठी नात्यांमध्ये संवाद हा यशाची गुरुकिल्ली ठरेल. पार्टनरशी मनमोकळेपणाने चर्चा करा आणि त्यांच्या भावनांचा आदर ठेवा. जोडीदाराच्या भावनांना समजून घेतल्यास नातं अधिक मजबूत बनेल. काहींसाठी जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
astrology
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.जास्त तेलकट किंवा बाहेरचे पदार्थ टाळा. पचनासंबंधी किरकोळ त्रास संभवतो. नियमित व्यायाम आणि ध्यान केल्यास मानसिक शांती मिळेल आणि शारीरिक तंदुरुस्ती टिकेल.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement