TRENDING:

आता आई-वडिलच म्हणतील हा गेम खेळा, 'मावळा' मिळवणार शिवकालीन मोहरा, Video

Last Updated:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा पट उलगडत शिवकालीन मोहरा मिळवण्याची संधी या गेममधून मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सलोनी पाटील, प्रतिनिधी
advertisement

मुंबई: आपण ऑनलाईन गेममध्ये तासनतास घालवणारी तरुणाई पाहिली असेल. या गेमच्या विळख्यातून मुलांना बाहेर काढण्याचा आई-वडिलांचा प्रयत्न असतो. पण आता एक स्वदेशी गेम आली असून ही खेळा म्हणून आई-वडिलच आग्रह करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा पट उलगडत शिवकालीन मोहरा मिळवण्याची संधी या गेममधून मिळणार आहे. पुण्यातील अनिरुद्ध राजदेरकर आणि शंतनू कुलकर्णी यांनी बनवलेली हीच मावळा गेम काय आहे? याबाबत जाणून घेऊ.

advertisement

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलमधील एका स्टॉलने सर्वांचे लक्ष वेधले. मावळा स्टॉलवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर विविध खेळ ठेवण्यात आले होते. आपल्याला अनेक खेळांबाबत माहिती असेल पण शिवरायांच्या जीवनावरील या खेळांतून इतिहास आणि मनोरंजन दोन्ही गोष्टींचा आनंद मिळणार आहे.

दोन मजले आणि 7 कमानी, महाराष्ट्रातील ऐतिहासिक बाजीराव विहीर पाहिलीत का?

advertisement

कशी बनवली मावळा गेम?

पुण्यातील अनिरुद्ध राजदेरकर आणि शंतनु कुलकर्णी हे दोघे इंजिनिअर आहेत. त्यांनी लहान मुलांपर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी खास गेम तयार केली आहे. त्यांच्याच संकल्पनेतून 'मावळा ब्रँड' तयार करण्यात आला आहे. शिवारायांचा मावळा या संकल्पनेनुसार विविध गेम तयार करण्यात आल्या आहेत. त्यातील 'अफजल खान एन्काउंटर' या गेमने अनेकांची मने जिंकली आहेत. शिवकाळातील अफजलखान वधाचा थरार या गेममधून अनुभवता येणार आहे.

advertisement

अफजल खान एन्काउंटर

अफजलखान एन्काउंटर या गेमला राष्ट्रीय स्तरावर नावाजलं गेलंय. भारत सरकारने सुरू केलेल्या ‘खेळांच्या संकल्पनेच्या स्पर्धेत अफजल खान एन्काउंटर या खेळाने ‘राष्ट्रीय पुरस्कार’ पटकावला. हा खेळ लहानपणी आपण नवा व्यापार खेळायचो त्या सारखाच आहे. त्या ठिकाणी मावळा असून त्या मावळ्यांबद्दल विविध माहिती आहे. तसेच पैशांऐवजी मोहोर आहे. कार्डऐवजी मावळ्यांबद्दलचे कार्ड असून त्यावर मावळ्यांची माहिती आहे, असे राजदेरकर यांनी सांगितले.

advertisement

नवीन वर्षातील जिमचा संकल्प मोडला? मग घरीच करा ही 7 सोपी योगासने, Video

इतिहास ज्ञात होणार

शिवाजी महाराजांवरील या खेळांमुळे लहान मुलांना इतिहासाबद्दल माहिती मिळणार आहे. खेळाच्या माध्यमातून मिळालेली माहिती सहसा विसरत नाही. याच कारणाने शिवरायांचा सविस्तर इतिहास मुलांना समजावा म्हणून या गेमची निर्मिती करण्यात आल्याचेही राजदेरकर सांगतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आता आई-वडिलच म्हणतील हा गेम खेळा, 'मावळा' मिळवणार शिवकालीन मोहरा, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल