TRENDING:

Video : रेडिमेड मंडप आणि फॅन्सी सजावटीचे पडदे करा ‘इथं’ स्वस्तात खरेदी; बाप्पाची सजावट होईल हटके

Last Updated:

बाप्पाच्या सजावटीसाठी रेडिमेड कापडी मंडप आणि फॅन्सी सजावटीचे पडदे या मार्केटमध्ये स्वस्तात खरेदी करता येतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 28 ऑगस्ट : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच ठिकठिकाणी यंदाच्या वर्षी काहीतरी स्पेशल सजावट करायचा विचारात भाविक दंग आहेत. त्यामुळे स्वस्त दरात सजावटीसाठी सामान मिळाले तर अति उत्तमच. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेडिमेड कापडी मंडप आणि फॅन्सी सजावटीचे पडदे तुम्हाला मुंबईतील  कोणत्या मार्केटमध्ये स्वस्तात खरेदी करता येतील याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
advertisement

कुठे कराल खरेदी?

दादर मार्केट मधील श्री महावीर साडी एम्पोरियम या दुकानात गणपती सजावटीसाठी लागणारे रेडिमेड कापडी मंडप आणि फॅन्सी सजावटीचे पडदे मिळत आहेत. या ठिकाणी सजावटीसाठी लागणाऱ्या पडद्यांची किंमत 60 रुपयांपासून सुरू होते. त्याचप्रमाणे इथे मिळणारे सुंदर कापडी मंडप हे 300 रुपयांपासून सुरू होते. 

50 रुपयांपासून सजावटीच्या वस्तू; बाप्पाच्या आगमनासाठी येथे करा आकर्षक दागिन्यांची खरेदी

advertisement

विविध प्रकारच्या मंडपाच्या डिझाईन बरोबरच त्याचा अनेक साइज रेंज देखील या ठिकाणी मिळतात. आकर्षक रंगाच्या कॉम्बिनेशन बरोबरच त्यावर सुंदर वर्क केलेले पडदे आणि मंडपांना या ठिकाणी अधिक मागणी आहे. सजावटीच्या झालर, टेबल पडदे, झुमर या ठिकाणी 300 रुपयांपासून मिळतील. रेडिमेड मखरमध्ये 4x4, 5x5 6x6 अशा वेगवेगळ्या साईज मिळतील. मखराची किंमत 300 रुपयांपासून सुरू असून ती साईज नुसार वाढली जाईल. 6x6 नव्हे तर अगदीच 8x10 साईज सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. 

advertisement

3 स्टेपलर आणि 5 मिनिटात बाप्पासाठी सुंदर मखर तयार; संदेश गावकरची अफलातून आयडिया!

प्रत्येक भाविकांना गणपती सजावटीमध्ये काहीतरी युनिक करण्याची इच्छा असते. आपले डेकोरेशन सुंदर आणि आकर्षित दिसण्यासाठी गणपती बाप्पाच्या वस्त्रांना शोभेल असे पडदे आणि कापडी मंडप खरेदी केले जातात. अशाच सजावटीसाठी लागणाऱ्या विविध पडद्यांची खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, अशी माहिती श्री महावीर साडी एम्पोरियमचे व्यवस्थापक दीपक यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Video : रेडिमेड मंडप आणि फॅन्सी सजावटीचे पडदे करा ‘इथं’ स्वस्तात खरेदी; बाप्पाची सजावट होईल हटके
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल