जास्त काम किंवा झोपेच्या कमतरतेमुळे आळस येऊ शकतो. पण खरं कारण तुमच्या शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता देखील असू शकतं. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, लोह, मॅग्नेशियम या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे शरीराच्या कार्यांवर परिणाम जाणवतात.
व्हिटॅमिन डी ला 'सनशाईन व्हिटॅमिन' म्हणतात. त्याच्या कमतरतेमुळे शरीर लवकर थकल्यासारखे वाटतं, हाडे कमकुवत होऊ लागतात आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश अंगावर घ्या आणि आहारात अंडी, दूध, मशरूम आणि फोर्टिफाइड कडधान्यं याचा समावेश करा.
advertisement
Thyroid : थायरॉईडचा त्रास कमी होण्यासाठी करा हे उपाय, वाचा सविस्तर माहिती
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता - सतत अशक्तपणा, श्वास लागणं आणि चक्कर येणं हे बहुतेकदा बी 12 च्या कमतरतेशी संबंधित असतं. हे जीवनसत्व शरीरात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशी (RBC) तयार करण्यास मदत करतं. यासाठी आहारात दूध, दही, चीज, अंडी खा.
लोहाची कमतरता - लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा होतो. लोहाची कमतरता असेल तर लवकर थकवा येणं, चेहरा फिकट पडणं आणि हातपाय थंड पडणं अशी लक्षणं दिसतात. यासाठीचा उपाय म्हणजे हिरव्या पालेभाज्या, गूळ, डाळिंब, कडधान्यं आणि भोपळा, सूर्यफूलाच्या बिया यांचा आहारात समावेश करणं.
Kidney Stone : किडनी स्टोन होण्यापासून रोखा, आधीपासूनच घ्या तब्येतीची काळजी, या टिप्स लक्षात ठेवा
मॅग्नेशियमची कमतरता - शरीराच्या ऊर्जा निर्मितीसाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे स्नायूंत पेटके येतात. झोपेची समस्या जाणवू शकते आणि वारंवार थकवा येऊ शकतो. यासाठी बदाम, काजू, पालक आणि संपूर्ण धान्याचा आहारात समावेश करा. सतत अशक्तपणा जाणवत असेल, हृदयाचे ठोके जलद होत असतील, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा अत्यधिक थकवा येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
