टाचांच्या दुखण्यामुळे चालणं देखील कठीण होऊ शकतं. सकाळी उठल्यावर टाचेत वेदना होत असतील किंवा बराच वेळ चालल्यानंतर सूज येत असेल, तर पायांची काळजी ताबडतोब घ्यायला सुरुवात केली पाहिजे.
Micronutrients: जीवनसत्त्वं, खनिजांची कमतरता, शरीरावर काय परिणाम होतात ?
टाचांचं दुखणं आणि सूज कमी करण्यासाठी मोहरीचं तंल, तीळाचं तेल, खोबरेल तेल आणि लसूण तेल हे सर्वोत्तम मानलं जातं. यासाठी तीळ आणि मोहरीचं तेल कोमट करा, त्यात कापूर मिसळा आणि थोडं मालिश करा. झोपण्यापूर्वी मसाज करा आणि पाय झाकून ठेवा.
advertisement
टाचांमधे तीव्र वेदना होत असतील तर पाय उंच करून आराम करा. पंधरा मिनिटं आईस पॅक लावा. स्ट्रेचिंग व्यायाम करा. मऊ, गादी असलेले बूट वापरा. गरज असेल तरच वेदना कमी करणारं जेल लावा.
टाचांच्या दुखण्यावर कोमट पाणी हा चांगला उपाय आहे. कोमट पाण्यात मीठ टाकून पंधरा मिनिटं पाय बुडवून ठेवा. यामुळे सूज कमी होते आणि स्नायूंना आराम मिळतो.
टाचेचा मागचा भाग दुखतो कारण अॅकिलीस टेंडोनिटिस. टाचेच्या मागच्या बाजूला असलेल्या टेंडनला सूज येते. बहुतेकदा जास्त धावणं, चुकीच्या आकाराचे शूज घालणं, वजन वाढणं किंवा अचानक व्यायाम सुरू करणं यामुळे दुखू शकतं.
Winter Digestion: हिवाळ्यात पचनाची अशी घ्या काळजी, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
टाचेच्या मागच्या भागात वेदना होतात. अशावेळी टिशूमधे दुखापत होणं, वेदना जाणवणं, हाडांमधे कॅल्शियम जमा होणं अशी कारणं असतात. व्हिटॅमिन डीची कमतरता, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता आणि युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानं टाचा दुखू शकतात. त्यामुळे टाचा दुखत असतील तर ही कारणं असू शकतात हा विचार नक्की करा.
