Micronutrients : केस खूप गळतायत ? अंग दुखतंय ? दुर्लक्ष करु नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या

Last Updated:

वारंवार आजारी पडणं, केस गळणं, हातपायांत जळजळ होणं, जखमा बऱ्या व्हायला वेळ लागणं, हाडांमधे वेदना होणं ही लक्षणं शरीरात जीवनसत्त्वं आणि खनिजांची कमतरता किंवा असंतुलित असल्याची लक्षणं आहेत. हे सूक्ष्म पोषक घटक वेळेत भरले नाहीत तर एकेक दिवसही कठीण जातो. समजून घेऊया या घटकांचं महत्त्व.

News18
News18
मुंबई : तब्येत कशी आहे हे लक्षणांवरुन कळतं. लक्षणांमुळे शरीरात कुठल्या भागात काय चाललंय याचा अंदाज बांधला जातो.
वारंवार आजारी पडणं, केस गळणं, हातपायांत जळजळ होणं, जखमा बऱ्या व्हायला वेळ लागणं, हाडांमधे वेदना होणं ही लक्षणं शरीरात जीवनसत्त्वं आणि खनिजांची कमतरता किंवा असंतुलित असल्याची लक्षणं आहेत. हे सूक्ष्म पोषक घटक वेळेत भरले नाहीत तर एकेक दिवसही कठीण जातो. समजून घेऊया या घटकांचं महत्त्व.
निरोगी आणि संतुलित आहाराकडे थोडंसं लक्ष दिलं तर सर्व आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांची भरपाई होईलच, शिवाय दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगणं शक्य होऊ शकेल. शरीराच्या विकासात प्रत्येक जीवनसत्व आणि खनिजं विशिष्ट भूमिका बजावतात.
advertisement
माइक्रोन्यूट्रिअंट्स कशात असतात -
बी1, बी2, बी12, इ : दूध, संपूर्ण धान्य, अंडी, मांस, मासे, मशरूम, एवोकॅडो इ.
व्हिटॅमिन सी (एस्कॉर्बिक अ‍ॅसिड): लिंबूवर्गीय फळे, शिमला मिरची, अंकुरलेलं कडधान्य इ.
व्हिटॅमिन ए: दुग्धजन्य पदार्थ, मासे, गोड बटाटे, गाजर, पालक,
व्हिटॅमिन डी: सूर्यप्रकाश, माशांचं तेल, दूध इ.
advertisement
व्हिटॅमिन ई: सूर्यफूल बियाणं, अंकुरलेले गहू, बदाम
व्हिटॅमिन के: हिरव्या भाज्या, सोयाबीन, भोपळा
सूक्ष्म खनिजांचं म्हणजे मायक्रोन्यूट्रिअंट्सचे स्रोत -
कॅल्शियम: दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, ब्रोकोली.
फॉस्फरस: साल्मन मासा, दही.
मॅग्नेशियम: बदाम, काजू, काळे बीन्स
सोडियम: मीठ, प्रक्रिया केलेले पदार्थ, कॅन केलेला सूप इ.
पोटॅशियम: मसूर, केळी इ.
सल्फर : लसूण, कांदे, अंकुरलेलं कडधान्यं, अंडी, मिनरल वॉटर.
advertisement
जीवनसत्त्व आणि खनिजं हे सूक्ष्म पोषक घटक शरीराच्या विविध कामांसाठी आवश्यक असतात. व्हिटॅमिन डी वगळता, सर्व सूक्ष्म पोषक घटकांसाठी आपल्या आहारावर अवलंबून असतो. शरीराला यांची गरज खूप कमी प्रमाणात असते, पण शरीर निरोगी ठेवण्यासाठी ते खूप महत्त्वाचे असतात.
जीवनसत्त्वांमुळे शरीराला ऊर्जा पोहचवणं, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं आणि रक्ताभिसरण सुरळीत राखण्यास मदत करतात, शरीराच्या वाढीसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी आणि द्रव संतुलनासाठी खनिजं आवश्यक असतात.
advertisement
जगभरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे.
भारतीयांमध्ये सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता
व्हिटॅमिन डी: आयसीएमआरच्या मते, सत्तर ते नव्वद टक्के भारतीयांमधे व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी आहे. व्हिटॅमिन डी, ज्याला सनशाइन व्हिटॅमिन म्हणूनही ओळखलं जातं, यामुळे आपला मूड, हाडं आणि रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.
advertisement
व्हिटॅमिन बी 12: राष्ट्रीय आरोग्य संस्थांनुसार, भारतीय लोकसंख्येच्या 47 टक्के लोकांमधे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आहे. केवळ सव्वीस टक्के भारतीयांमधे हे प्रमाण पुरेसं आहे. लाल रक्तपेशी, डीएनए संश्लेषण आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी ते आवश्यक आहे.
व्हिटॅमिन ए: अपुर्‍या पोषणामुळे मुलं आणि महिलांमधे कमतरता निर्माण होण्याचा धोका असतो. हे चांगल्या दृष्टीसाठी आणि विविध संसर्गांपासून संरक्षणासाठी एक आवश्यक सूक्ष्म पोषक तत्व आहे.
advertisement
लोह: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) नुसार,15-49 वयोगटातील भारतीय महिला आणि पुरुषांमधे अशक्तपणा (लोहाची कमतरता) चं प्रमाण अनुक्रमे 57 आणि 25 टक्के आहे. त्याच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, फिकटपणा, नखं ठिसूळ होणं आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अंडी, मासे, डाळी, हिरव्या पालेभाज्या, बाजरी आणि गूळ खाणं यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
कॅल्शियम: हाडांची घनता राखण्यासाठी कॅल्शियमची मोठी भूमिका असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांमधे हाडांचा ठिसूळपणा वाढतो. ज्यामुळे हाडे कमकुवत होतात.
व्हिटॅमिन बी 12: शाकाहारी असाल तर पुरेसं बी 12 मिळणं कठीण आहे. ते दूध आणि दुधाशी संबंधित उत्पादनांमध्ये कमी प्रमाणात आढळतं. मांसाहारी असलेल्या काहींना आतड्यांमधील एन्झाइमची कमतरता आणि अँटीबॉडीजसारख्या कारणांमुळे समस्या येऊ शकतात. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया किंवा आतड्यांसंबंधी शस्त्रक्रिया देखील समस्या निर्माण करू शकतात.
व्हिटॅमिन डी: सूर्यप्रकाश हा एकमेव नैसर्गिक स्रोत आहे. प्रकाशात जाणं शक्य नसेल तर तपासणी करणं, अन्नाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. डिहायड्रेशन, लोह, मॅग्नेशियम,
काही जण मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेतात. पण स्ट्रेचिंग किंवा व्यायाम करत नाहीत, केवळ मल्टीव्हिटॅमिन घेतल्यानं त्यांचं शोषण योग्यरित्या होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. आहारात, औषधांमधे कोणतेही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Micronutrients : केस खूप गळतायत ? अंग दुखतंय ? दुर्लक्ष करु नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement