Smriti Mandhana VIDEO : लाडक्या बहिणीचा पाठीराखा! लग्न मोडल्यानंतर स्मृतीच्या मागे सावलीसारखा, कोण आहे 'तो'?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
स्मृती मानधना हीने मागच्याच रविवारी म्युझिक कंपोझर पलाश मुच्छलसोबत लग्न मोडल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. या घोषणेनंतर तिने आता मैदानात सरावाला सूरूवात केली होती.विशेष म्हणजे आज ती एअरपोर्टरवर स्पॉट झाली होती.
Smriti Mandhana News: टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेती खेळाडू स्मृती मानधना हीने मागच्याच रविवारी म्युझिक कंपोझर पलाश मुच्छलसोबत लग्न मोडल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. या घोषणेनंतर तिने आता मैदानात सरावाला सूरूवात केली होती.विशेष म्हणजे आज ती एअरपोर्टरवर स्पॉट झाली होती.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा पाठिराखा देखील तिच्यासोबत उपस्थित होता.हा पाठिराखा नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर 23 नोव्हेंबर 2025 ला स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न होणार होतं. मात्र लग्नाला काही तास उरले असताना अचानक स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हार्टअटॅक आल्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. या दरम्यान पलाश मुच्छलचीही तबियत बिघडली होती.
advertisement
या सगळ्या घटनाक्रमा दरम्यान अनेक घडामोडी घडत होत्या. पलाशचे अनेक चार्ट देखील व्हायरल होत होते.तसेच दोघे पुन्हा 7 तारखेला लग्नबंधनात अडकतील अशी देखील माहिती समोर आली होती. पण तब्बल 14 दिवसानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्मृती मानधनाने पलाश मुच्छलसोबत लग्न तुटल्याची माहिती दिली होती. तिच्या पोस्टनंतर पलाशने देखील लग्न तुटल्याची पोस्ट शेअर केली होती.
advertisement
लग्न मोडल्याचे जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्मृती मानधना मैदानात दिसली होती. स्मृती मानधना श्रीलंका विरूद्ध सामन्याआधी मैदानात सराव करताना दिसली होती. यानंतर आज स्मृती मानधना लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली होती. यावेळी माध्यमांनी तिला कॅमेरात कैद केले होते.या दरम्यान स्मृतीसोबत एक मुलगा देखील दिसला होता.
हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून स्मृतीचा मोठा भाऊ श्रवण मानधना आहे. श्रवण मानधना तिच्यासोबत आज एअरपोर्टवर होता.त्यामुळे बहिणीच्या कठिण काळात श्रवण तिच्यासोबत होता. श्रवण स्वतः एक क्रिकेटपटू आहे आणि त्यानेच स्मृतीला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केले आणि त्याला पाहूनच स्मृतीने क्रिकेट शिकायला सुरुवात केली, तो तिच्यासाठी एक प्रेरणास्रोत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 10, 2025 7:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana VIDEO : लाडक्या बहिणीचा पाठीराखा! लग्न मोडल्यानंतर स्मृतीच्या मागे सावलीसारखा, कोण आहे 'तो'?











