Kidneys : त्वचेतले बदल नीट बघा, असू शकतात गंभीर आजाराचे संकेत, वाचा सविस्तर

Last Updated:

मूत्रपिंडांच्या आजाराचं निदान करण्यासाठी रक्त आणि लघवीच्या चाचण्या हे मुख्य मार्ग आहेत, पण हा आजार वाढतो तेव्हा या आजाराच्या पुढच्या टप्प्यात त्वचेतील बदल दिसून येतात. त्वचेचं आणि इतर लक्षणांचं निरीक्षण करुन उपाय केल्यानं रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होऊ शकते.

News18
News18
मुंबई : मूत्रपिंडाच्या आजारांचं प्रमाण वाढतंय. हा विकार अचानक होत नाही, त्याची लक्षणं आधीपासून जाणवत असतात. पण ती लक्षणं या विकारांसंबंधित असतील असं काही वेळा कळत नाही.
मूत्रपिंडांच्या आजाराचं निदान करण्यासाठी रक्त आणि लघवीच्या चाचण्या हे मुख्य मार्ग आहेत, पण हा आजार वाढतो तेव्हा या आजाराच्या पुढच्या टप्प्यात त्वचेत बदल दिसून येतात. त्वचेचं आणि इतर लक्षणांचं निरीक्षण करुन उपाय केल्यानं रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होऊ शकते.
रक्त फिल्टर करण्यापासून ते खनिज आणि द्रव संतुलन राखण्यापर्यंत शरीर निरोगी ठेवण्यात मूत्रपिंडांची मोठी भूमिका असते. पण जेव्हा मूत्रपिंड हळूहळू कमकुवत होतात, तेव्हा शरीरात वाढणारे विषारी पदार्थ बहुतेकदा प्रथम त्वचेवर दिसतात. ही लक्षणं लवकर ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे.
advertisement
त्वचा खूप खडबडीत, कोरडी होणं, हे मूत्रपिंड निकामी होण्याचं एक सामान्य लक्षण आहे. नॅशनल किडनी फाऊंडेशनच्या एका अहवालानुसार, CKD म्हणजेच chronic kidney disease असलेल्या सुमारे 72 टक्के जणांना झेरोसिस आहे. झेरोसिस म्हणजे त्वचा अति जास्त कोरडी होणं.
advertisement
आपल्या घाम आणि तैल ग्रंथी नियंत्रित करण्यास मूत्रपिंडं मदत करतात, म्हणून जेव्हा मूत्रपिंडं कमकुवत होतात तेव्हा त्वचा कोरडी होऊ लागते. त्वचा कोरडी होऊन फुटू शकते, त्यात भेगा तयार होतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. त्वचा जास्त कोरडी होणं हे त्वचा पिवळी पडणं, त्वचेवर खाज सुटणं यापेक्षाही आधी दिसणारं लक्षणं आहे असं संशोधनात दिसून आलं आहे.
advertisement
हे टाळण्यासाठी, दररोज हलकं मॉइश्चरायझर वापरा, जास्त वेळ गरम पाण्यानं आंघोळ करणं टाळा आणि श्वास  सहज घेता येईल असे सुती कपडे घाला. कोरडेपणा कायम राहिला तर मूत्रपिंड तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मूत्रपिंडाच्या समस्यांमध्ये सतत, तीव्र खाज येणं खूप सामान्य लक्षण आहे. शरीरात युरियासारखे टाकाऊ पदार्थ साचल्यानं त्वचेतील नसांवर परिणाम होतो, ज्यामुळे खाज वाढते. सुमारे छपन्न टक्के chronic kidney disease असलेल्या रुग्णांना ही समस्या जाणवते आणि बहुतेकदा ती वाढलेल्या फॉस्फरस आणि पीटीएच पातळीशी संबंधित असते.
advertisement
त्वचा कोरडी होऊन त्यावर सतत ओरखडे आल्यानं त्वचेवर व्रण, फोड किंवा जाड ठिपके येऊ शकतात.
काही जणांना, त्वचेवर येणाऱ्या खाजेमुळे झोप लागत नाही. दिनचर्येतही अडथळे येतात. अशावेळी, डॉक्टर अनेकदा उपचारांसाठी टॉपिकल क्रीम, यूव्हीबी थेरपी किंवा ओटमील बाथची शिफारस करतात, पण मूत्रपिंडांच्या समस्येवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे.
advertisement
त्वचेवर पुरळ उठणं - मूत्रपिंडांच्या गंभीर नुकसानीमुळे त्वचेवर पुरळ उठू शकतं. रक्तात कचरा जमा होतो तेव्हा त्वचेवर लहान, खाज सुटणारे अडथळे तयार होतात, जे नंतर खडबडीत ठिपक्यांएवढे होतात.
यामुळे पुरळ, जांभळे डाग किंवा अल्सर देखील होऊ शकतात, ही लक्षणं मुख्यतः पायांवर दिसतात.  कॅल्सीफिलॅक्सिस नावाची एक गंभीर स्थिती मूत्रपिंड निकामी होण्याशी देखील संबंधित आहे, ज्यामध्ये त्वचा कडक होते आणि अल्सर होतात.
advertisement
सुमारे त्रेचाळीस टक्के किडनी विकार असलेल्यांना बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाच्या त्वचेच्या संसर्गाचा त्रास होतो.
अशावेळी, सौम्य, जास्त सुगंध नसलेला साबण वापरल्यानं आणि त्वचेला घासण्याऐवजी हळूवारपणे पुसल्यानं जळजळ आणि वेदना कमी होऊ शकतात. पुरळ वाढलं किंवा फोड वेदनादायक झाले किंवा पू येत असेल तर डॉक्टरांची भेट घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kidneys : त्वचेतले बदल नीट बघा, असू शकतात गंभीर आजाराचे संकेत, वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement