TRENDING:

Chicken Recipe: नुसतं नाव काढलं तर तोंडाला पाणी सुटेल, आगरी स्टाईल चिकन लपेटा, अशी बनवा रेसिपी

Last Updated:

Nonveg Recipe: मांसाहार म्हटलं की प्रत्येकाची एखादी आवडती डिश असते. आगरी जेवण अनेकांना आवडतं. तुम्ही देखील घरीच आगरी स्टाईल चिकन लपेटा रेसिपी बनवू शकता

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण: नॉनव्हेज खायचं म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. अनेकजण मांसाहारी जेवणातील विविध प्रकार ट्राय करत असतात. चिकनपासून चिकन बिर्याणी, चिकन भाजी, भजी, खिमा, लॉलीपॉप अशा डिश अनेकजण बनवतात देखील. अशीच एक चिकनची प्रसिद्ध डिश म्हणजे चिकन लपेटा होय. हीच चटपटीत आगरी स्टाईल चिकन लपेटा रेसिपी गृहिणी अरुणा नितीन पाटील यांनी सांगितली आहे.
advertisement

चिकन लपेटासाठी साहित्य

चिकन, टोमॅटो, कांदा, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, हळद, आगरी मसाला, धना पावडर, कसुरी मेथी (असले तर), सुके खोबरे, काजू, कोथिंबीर, हिरवी मिरची, अंडे (पाहिजे असेल तर), तेल, वेलची, दालचिनी, गरम पाणी, मीठ (चवीनुसार).

शेंगदाणा चटणी खाऊन कंटाळलात? हिवाळ्यात बनवा पेरूची टेस्टी रेसिपी, खाल एकदम आवडीने, Video

advertisement

चिकन लपेटा कृती

चिकन मॅरीनेट करण्यासाठी चिकनमध्ये दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, आगरी मसाला, हळद, गरम मसाला आणि मीठ लावून काही वेळ बाजूला ठेवा. (वेळ नसल्यास दह्याचा वापर करत डायरेक्ट लपेटा साठी रेडी करणे) एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्या. कांदा परतल्यावर त्यात टोमॅटो प्युरी घालून शिजवा.

advertisement

मॅरीनेट केलेले चिकन घालून व्यवस्थित परतून घ्या. सुके खोबरे आणि काजूची पेस्ट तयार करून ग्रेव्हीमध्ये मिसळा. आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून झाकण ठेवून चिकन शिजू द्या. चिकन शिजल्यावर त्यात कसुरी मेथी आणि हिरवी मिरची घालून मिक्स करा. अशा पद्धतीने गरमागरम चिकन लपेटा तयार होईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा राहील चमकदार, असा करा बदामाच्या तेलाचा वापर, होईल फायदाच फायदा
सर्व पहा

गरमागरम चिकन लपेटा पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा. अशा पद्धतीत आपण चिकन लपेटा घरगुती मसाले वापरून बनवू शकतो. तुम्ही देखील ही सोपी रेसिपी ट्राय करू शकता.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Chicken Recipe: नुसतं नाव काढलं तर तोंडाला पाणी सुटेल, आगरी स्टाईल चिकन लपेटा, अशी बनवा रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल