अंड्याचे काप बनवण्यासाठी वेळ आणि साहित्यही अगदी कमी लागतं. पण तिची चव मात्र जिभेवर रेंगाळत राहते. अगदी स्टार्टर म्हणून असो किंवा मुख्य मेनू म्हणून सुद्धा ही डिश घरच्या घरी कुणीही बनवू शकतं. अगदी 5 मिनिटांत तयार होणारी ही चटपटीत आणि चविष्ठ रेसिपी पाहुया.
Kolhapuri Mutton: गटारीसाठी अस्सल कोल्हापुरी मटण, असं बनवाल तर बोटं चाखत खाल, एकदम झणझणीत रेसिपी!
advertisement
साहित्य: उकडलेली 3-4 अंडी, 1 चमचा लाल तिखट, चिमुटभर जिरे पावडर, चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ, पाणी, 1 चमचा तूप किंवा लोणी.
अंड्यांचे काप बनवण्याची कृती
या रेसिपीसाठी आधी उकडलेली अंडी तयार ठेवावीत. अंडी सोलून उभी कापून घ्या. त्यानंतर त्यावर लावण्यासाठी एक खास सारण बनवावं लागतं. हे सारण बनवण्यासाठी एक चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, चिमूटभर जिरे पावडर, एक चमचा गरम मसाला आणि थोडं पाणी लागेल. हे सर्व घटक एकत्र करून त्याचं एकसंध मिश्रण तयार करावं. हे तयार सारण अंड्याच्या चिरलेल्या भागाला लावून तूप किवा बटर टाकून पॅनमध्ये परतावं.
मसाला भरलेले हे अंड्याचे काप चांगले भाजून घ्यावे. चवीला आणि दिसायला देखील ही रेसिपी अतिशय खास होते. तुम्ही अंड्याचे काप स्टार्टरलाही खाऊ शकता किंवा पोळी आणि गरम गरम भातासोबत सुद्धा ही हटके रेसिपी सर्व्ह करू शकता.