झेटूनी फुलांच्या भाजीसाठी साहित्य
स्वच्छ धुवून घेतलेली झेटूनीची फुले, हळद, मीठ, तेल, मिरची पावडर, जिरे, बारीक चिरलेला कांदा आणि लसूण इत्यादी.
Health Tips: ग्रीन टी पिल्यानं खरंच वजन कमी होतं? नेमके फायदे काय? आहारतज्ज्ञांनी दिली माहिती
झेटूनी फुलांच्या भाजीची कृती
सर्वप्रथम झेटूनीची फुले स्वच्छ धुवून घ्यावीत. यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यावा. त्याच बरोबर एक कांडी लसूण बारीक चिरून घ्यावा. गॅस सुरू करून त्यावर पातेलं किंवा कढई ठेवावी. त्यामध्ये दोन चमचे तेल घालावे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालावे. जिरे चांगले तडतडू लागल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालावा. कांदा आणि लसूण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ आणि मिरची पावडर घालावी.
advertisement
ही फोडणी चांगली परतून घ्यावी. यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली फुले फोडणीमध्ये घालावी व चांगली परतून घ्यावी. सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटे गॅसवर मध्यम आचेवर शिजू द्यावे. दहा मिनिटांनंतर गॅस बंद करून फुले एका प्लेटमध्ये घ्यावीत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत इतर भाज्यांबरोबर खाण्यासाठी सर्व्ह करावे.
अशा पद्धतीने अत्यंत कमी साहित्यात तुम्ही झेटूनीची फुले ही रेसिपी अत्यंत सोप्या पद्धतीने तयार करू शकता. अत्यंत रुचकर पोषक तत्वांनी भरपूर असलेली ही फुले सर्वांनी प्रत्येक पावसाळ्यात एकदा तरी अवश्य ट्राय करायला हवीत.