चित्रांगी दाण्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
चित्रांगी दाणे, कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट, लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, शेंगदाणा कूट, लाल तिखट, हळद, मीठ, धने पूड, मसाला, तेल, जिरे, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे साहित्य लागेल.
दररोज साधे ओट्स खाऊन कंटाळा आलाय? मग बनवा चविष्ट आणि हेल्दी ओट्स उपमा, खाल आवडीने
advertisement
चित्रांगी दाण्याची भाजी बनवण्याची कृती
सर्वात आधी दाणे 5 ते 6 तास भिजवून ठेवायचे आहे. त्यानंतर ते शिजवून घ्यायचे आहे. दाणे शिजवून घेतल्यानंतर भाजीसाठी ओला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी सर्वात आधी कढईत तेल टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर जिरे आणि कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता थोडा कडक झाल्यानंतर त्यात कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची. कांद्याची पेस्ट लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात लसूण पेस्ट टाकायची आहे. लसूण पेस्ट शिजल्यानंतर त्यात लाल तिखट आणि इतर मसाले टाकून घ्यायचे आहे. मसाले शिजल्यानंतर त्यात शेंगदाणा कूट टाकून घ्यायचे. ते व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात टोमॅटो टाकून घ्यायचे आहे.
हे सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर हा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात दाणे टाकून घ्यायचे आहे. दाणे सुद्धा त्यात 5 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात गरम पाणी टाकून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तसा रस्सा तुम्ही बनवून घेऊ शकता. त्यानंतर त्या रस्स्याच्या दोन ते तीन उकळी काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर भाजी तयार होईल. त्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. चित्रांगी दाण्याची भाजी तयार झालेली असेल.